तू या जगामध्ये काय घेऊन आला होता आणि काय घेऊन जाणार? हा डायलॉग तुम्ही अनेकवेळा ऐकला असेल. याचा अर्थ हा आहे कि जेव्हा आपला जन्म झाला होता तेव्हा आपण खाली हात आलो होतो आणि जेव्हा मरतो तेव्हा खाली हातच जातो. पण आज आपण एक अशा बाळाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा ते खाली हात आले नव्हते तर आपल्यासोबत एक खास वस्तू घेऊन आले होते. आता या कारणामुळे हे बाळ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

आईच्या गर्भामधून एक खास वस्तू घेऊन आले बाळ :- वास्तविक व्हिएतनाममधील हाई फोंग इंटरनेशनल हॉस्पिटलमध्ये जन्मलेले एक बाळ सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हे बाळ जेव्हा गर्भामधून बाहेर आले होते तेव्हा डॉक्टरांची नजर त्याच्या हातामध्ये असलेल्या एका पिवळ्या आणि काळ्या वस्तूवर पडली. या बाळाने हि वस्तू आपल्या बोटांनी घट्ट पकडली होती. अशामध्ये हॉस्पिटलच्या स्टाफने त्याचा फोटो काढला आणि आता हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे हि वस्तू? :- बाळाच्या हातामध्ये दिसत असलेली हि पिवळी काळी वस्तू वास्तविक एक कंट्रासेप्टिव कॉइल आहे. याला आययूडी (इंट्रायूटरिन डिव्हाइस, किंवा कॉइल) असे देखील म्हणतात. हि एक टी-शेप प्लास्टिक आणि कॉपरची बनलेली वस्तू असते. याला महिला आपल्या प्राइवेट पार्टमध्ये लावतात, ज्यामुळे प्रेग्नंसी होत नाही. हि वस्तू बाळाच्या ३४ वर्षीय आईने दोन वर्षांपूर्वी लागली होती. तथापि या कॉइलने व्यवस्थित काम केले नाही आणि बाळाचा जन्म झाला. महिला आधी दोन मुलांची आई होती आणि तिला तिसरे मुल नको होते. यामुळे तिने हे डिवाईस यूज केले होते.

काय म्हणाले डॉक्टर? :- प्रसूती करणारे डॉक्टर त्राण विएत फुओंग म्हणाले कि जेव्हा मी प्रसूती करत होतो तेव्हा बाळाच्या हातामध्ये कंट्रासेप्टिव कॉइल पाहिले होते. हे जरूर त्याच्या आईने लावलेल्या ठिकाणावरून हटले असेल. यामुळे ती प्रेग्नंट झाली. बाळ जेव्हा जन्मले होते तेव्हा त्याने हि कॉइल खूप घट्ट पकडली होती. मला हे खूपच रंजक वाटले यामुळे मी त्याचा फोटो घेतला. कदाचित हि पहिली केस आहे ज्यामध्ये नवजात बालक गर्भामधून एक वस्तू घेऊन आले आहे.

खूप व्हायरल होत आहे फोटो :- बाळाचा हा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक याला पाहून अनेक प्रकारचे कमेंट करत आहेत. कोणी म्हणत आहे कि बाळाने जीवनावर विजय मिळवला आहे. आईची हीच इच्छा होती कि त्याने जन्म घेऊ नये पण तिने असे होऊ दिले नाही.तसे जर तुम्ही देखील अशाप्रकारच्या डिवाईसचा वापर करण्याच्या प्रयत्न करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. इंस्टाग्रामवर महिलेने याबद्दल आपला एक अनुभव शेयर केला आहे. याला लावल्यानंतर तिला काही समस्यांचा सामना करावा लागला होता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.