कर्क राशी राशीचक्रातील चौथी राशी आहे. या राशीचा स्वामी ग्रह चंद्र असतो. म्हणून कर्क राशीचे लोक चंद्रामुळे खूप प्रभावित असतात. चंद्र हा मनाचा कारक आहे, यामुळे या राशीच्या लोकांमध्ये चंचलतेची भावना पाहायला मिळते. हि भावना त्यांच्या इतर अनेक कार्यामध्ये पाहायला मिळत असते. अशामध्ये आज आम्ही कर्क राशीच्या लोकांबद्दल खास माहिती देणार आहोत, चला तर जाणून घेऊया. कर्क राशीच्या लोकांच्या वैशिष्ट्यांविषयी.

शारीरिक सरंचना :- या राशीच्या लोकांच्या चेहऱ्याची बनावट गोल असते. हे दिसायला खूप आकर्षक असतात, लोक यांच्या सौंदर्याने यांच्याकडे आकर्षित होतात. या राशीच्या लोकांच्या शरीरावर कमी केस असतात. या लोकांची उंची इतर लोकांच्या तुलनेत कमी असते. याशिवाय यांचा रंग गोरा असतो आणि कमी वयामध्येच हे जास्त वयाचे दिसू लागतात.स्वभाव :- या राशीच्या लोकांचा स्वभाव कधी कधी खूप जिद्दी असतो, ज्यामुळे यांना अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते. हे लोक कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असतात. या लोकांना स्वातंत्र्य प्रिय असते. परंतु यांच्या अनेक कामांमध्ये अनियमितता दिसून येते. यांची खासियत हि सुद्धा असते कि हे लोक निरर्थक कामांपासून दूर राहतात.
प्रेम जीवन :- यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाला एक वेगळे स्थान असते. हे लोक खूप विश्वासू आणि काळजी घेणारे असतात. या राशीचे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात, पण त्या बदल्यात ते त्याच प्रेमाची अपेक्षा ठेवतात, जे हे देत असतात. अनेक बाबतीत हे आपल्या पार्टनरबद्दल पजेसिव होतात, यामुळे ते स्वतः अधिक कठोर दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते खूप सौम्य स्वभावाचे असतात.कार्यक्षेत्र :- या लोकांची स्मृती खूपच आश्चर्यकारक असते, त्याचबरोबर हे दृढनिश्चयी असतात. हे लोक ज्या क्षेत्रामध्ये मन लावून काम करतात त्या क्षेत्रामध्ये ते आपला प्रभाव नक्की पाडतात आणि खूप नाव कमावतात. या लोकांचा राशी ग्रह चंद्र असतो म्हणून या राशीचे लोक जास्त करून जल किंवा द्रव्य पदार्थाच्या व्यापारामध्ये असतात.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.