कोरोन विषाणूमुळे सध्या सर्व जग ठप्प आहे आणि अशामध्ये सिरियल्स आणि चित्रपटांची शुटींगदेखील पूर्ण होत नाही आहे. यामुळे आता जुन्या सिरियल्स टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात येऊ लागल्या आहेत. रामायण आणि महाभारत या सिरियल्सचे टेलीकास्टदेखील पुन्हा सुरु करण्यात आले आहे. सध्या अनेक दर्शक जुन्या टीव्ही सिरियल्स पुन्हा प्रसारित करण्याची मागणी करत आहेत. अशा काही सिरियल्स पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेल्या आहेत ज्या कितीही वेळा जरी पाहिल्या तरी बोर होत नाही. अशाच काही सिरियल्सची माहिती आपण घेणार आहोत.९० च्या दशकामध्ये शक्तिमान हि सिरीयल दूरदर्शनवर प्रसारित केली जात होती. शक्तिमान हि सिरीयल त्यावेळी दर्शक खूपच पसंत करत होते. शक्तिमान भारतातील पहिला सुपरहिरो होता. लहान मुलांमध्ये याची खूपच क्रेज होती. हि सिरीयल काही कारणामुळे अचानक बंद करण्यात आली. पण आजसुद्धा दर्शकांच्या मनामध्ये हि सिरीयल जिवंत आहे.डीडी नॅशनलवर प्रसारित होणारी चंद्रकांता हि सिरीयल आपल्याला चांगलीच माहिती असेल. हि सिरीयल १९९४ ते १९९६ पर्यंत प्रसारित केली गेली होती. जी दर्शकांना देखील खूपच आवडली होती. या सिरीयलमध्ये मुकेश खन्ना, शिखा स्वरूप, पंकज कपूर यांच्या सारखे दिग्गज कलाकार पाहायला मिळाले होते.मोगली सिरीयल तर आपण कशी विसरू शकतो. आपल्या सर्वांच्याच बालपणीची ती एक आठवण आहे. या सिरीयल मधील जंगल जंगल बात चली है हे गाणे तर सुपरहिट झाले होते. लोकांना आजसुद्धा हि सिरीयल तितकीच आवडते जितकी त्यावेळी आवडत होती. या सिरीयलमध्ये एका मुलाची स्टोरी दाखवण्यात आली होती जो जंगलामध्ये प्राण्यांसोबत राहत असतो. लहान मुलांचा हा फेवरेट शो होता.दूरदर्शनवरील लोकप्रिय सिरियल्सपैकी विक्रम बेताल हि एक प्रसिद्ध सिरीयल होती. दर्शक आजसुद्धा या सिरीयलला पसंत करतात. या शोमध्ये अनेक रहस्यमय कथा दाखवण्यात आल्या होत्या. दर्शक हा शो पाहण्यासाठी उतावळे होत असत. यातील सर्व कथा राजा विक्रमादित्य आणि पिशाच बेतालबद्दल होत्या.