झोप हि मनुष्यासाठी सर्वात महत्वाची माणली जाते, पण आवश्यकतेपेक्षा जास्त झोप आणि चुकीच्या ठिकाणी झोपण्याने आयुष्यामध्ये अनेक समस्यांशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. आचार्य चाणक्यने आपल्या चाणक्य नीतिमध्ये मनुष्याला सफलतेची अनेक सूत्रे प्रदान केली आहेत. चाणक्य नीतिमध्ये त्यांनी अशा ७ लोकांचे वर्णन केले आहे जे झोपलेले दिसले तर त्यांना त्याचक्षणी जागे केले पाहिजे. चला तर जाणून घेऊयात ते कोणते लोक आहेत.

काक चेष्टा, बको ध्यानं, स्वान निद्रा तथैव च। या श्लोकमध्ये असे सांगितले आहे कि जर कोणतीही व्यक्ती अभ्यास करताना झोपली असेल तर तिला लगेच उठवले पाहिजे. कारण अभ्यास करताना झोपणे असफलते कारण बनते. ज्याप्रकारे सोने आगीमध्ये तापून कुंदन बनते त्याचप्रकारे एक विद्यार्थी देखील कठोर मेहनतीने सफलता मिळवू शकतो.सेवक किंवा नोकर जर काम करताना झोपलेला दिसला तर त्याला त्याचक्षणी उठवायला पाहिजे. कारण चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या वेळी झोप घेणे त्याच्यासाठी त्रासदायक होऊ शकते.
जर चौकीदार कधी आपल्या कामाच्या ठिकाणी झोपलेला दिसला तर त्याला लगेच उठवायला पाहिजे. त्याचे काम जागत राहणे आहे, अशामध्ये कामाच्या वेळी त्याचे झोपणे सुरक्षितता धोक्यात आणण्यासारखे आहे.एखादी व्यक्ती प्रवास करताना झोपलेली दिसली तर तिला झोपेतून उठवायला हवे. कारण जर तो झोपला तर तो आपल्या इच्छित स्थानी पोहोचू शकणार नाही.जर एखादी घाबरलेली व्यक्ती आपला वेळ घालवण्यासाठी झोपण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला लगेच उठवायला हवे. एखादी व्यक्ती घाबरून झोपली असेल तर त्याला जागे करून तिची भीती दूर करायला हवी जेणेकरून तो आपल्या कर्माच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल.चाणक्यने सांगितली होते कि एखाद्या भांडाराची सुरक्षा करणारी व्यक्ती कधी झोपताना नाही दिसली पाहिजे कारण जर तो झोपला तर त्याचा सर्व ऐवज लुटीला जाऊ शकतो.