नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे एकमेव फळ आहे जे नैसर्गिकरित्या शुद्ध गोड पाणी देते. नारळाच्या पाण्यात शरीरात निरोगी ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट पोषक घटक असतात. नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, मॅंगनीज, पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम देखील असतात. नारळाचे पाणी पिण्यामुळे अजीर्ण झाले असेल तर आराम मिळतो. गरोदर स्त्रियांसाठी नारळपाणी खूप फायदेशीर आहे, नारळपाणी अशा अनेक आजारांसाठी फायदेशीर आहे, चला त्याचे फायदे जाणून घेऊया.शरीरातील साखरेची पातळी कमी करते :- नारळाच्या पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेहावरील रामबाण उपाय हा नारळ पाणी आहे. नारळ पाण्यामुळे शरीरातील इन्सुलिन वाढते.
अतिसार :-
नारळ पाणी पिऊन शरीरात पाण्याची पातळी वाढते अतिसार, उलट्या या आजारांमुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते पण त्यावेळी जर तुम्ही नारळपाणी घेतलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
लवकर येणारे वृद्धत्व :- त्यात आढळणारी सायटोकिन्स नवीन पेशी तयार करण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात.
हृदय रोग :- नारळाचे पाणी कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. त्याचे अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत करते.
लठ्ठपणा :- नारळाच्या पाण्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. ते सेवन केल्याने पोट भरल्यासारखे जाणवते त्यामुळे भूक कमी लागते.
उच्च रक्तदाब :- नारळ पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.त्याचप्रमाणे तणाव भागवण्यासाठी चा गोड आणि नैसर्गिक उपाय म्हणजे नारळ पाणी. हे पाणी सौंदर्या साठी ही लाभदायक आहे. हे पाणी त्वचा आणि केसांना लावल्यास अनेक फायदे होऊ शकतात. त्वचेला नारळ पाणी लावून अतिनील सूर्य किरणांपासून होणारे त्वचेचे नुकसान टाळता येते. नारळ पाणी चेहऱ्यावर रोज लावल्यास चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या यांपासून सुटका होते. नारळ पाण्यात जीवन सत्व आणि लोह भरपूर प्रमाणात आहेत. लोह केसांच्या मुळांना बळकट करते आणि जीवनसत्व केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. अर्थात नारळ पाण्याच्या नियमित वापरामुळे केसांचे गळणे कमी होते. तसेच केसांना नारळ पाणी लावल्यास केसांमधील आद्रता टिकून राहण्यास मदत होते व केस रेशमी व मुलायम होतात. त्याचप्रमाणे कोंडा कमी होतो.