होळीच्या रंगात न्हाऊन निघाली टीम इंडिया, जल्लोषा साजरी केली होती, पहा फोटोज…

2 Min Read

संपूर्ण देशामध्ये सध्या होळीचा सण साजरा केला जात आहे. भारती टीम देखील यापासून दूर राहू शकली नाही. वास्तविक विराट कोहली आणि शुभमन गिलचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली डांस करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये पाहू शकता कि सर्वजण खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. भारती टीमचा युवा फलंदाज शुभमन गिल मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत आहे. तर व्हिडीओमध्ये पाठीमागे विराट कोहली डांस करताना पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

रोहित आणि विराटचा हा डांस व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. दोघेही इतर खेळाडूंना रंग लावताना पाहायला मिळत आहेत. सध्या भारतीन टीम अहमदाबादमध्ये आहे जिथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेवटची टेस्ट खेळली जाणार आहे. टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावस्कर सीरीज मध्ये २-१ ने पुढे आहे. जर ती हा सामना जिंकली तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल.

भारतीय टीमला इंदोर टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा ९ गडी राखून पराभव केला होता. तर याआधी भारताने पाहुण्या संघाचा दारूण पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

दुसरीकडे जर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना जिंकली तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. सध्या सध्या WTC फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *