भारतीय टीमचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला नाही. त्याने विश्रांती घेतली आहे. चहल सध्या आशिया कपसाठी स्वतःला तयार करत आहे. या दरम्यान एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे त्याचे चाहते हैराण झाले आहेत. यावेळी चहल खेळासाठी नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. असे म्हंटले जात आहे कि पत्नी धनश्री वर्मासोबत त्यांचे नाते बिघडले आहे.

गेल्या दिवसांत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चहलने एक फोटो लावला होता. तर धनश्रीने इंस्टाग्राम बायोमधून आपले नाव बदलले आहे. त्यानंतर असे म्हंटले जात आहे कि त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक नाही. चहलने स्टोरीमध्ये जो फोटो लावला होता त्यावर लिहिले होते कि नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. तर धनश्रीने आपले सरनेम चहल हटवले आहे. याशिवाय त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे ज्यामध्ये लिहिले आहे कि एक राजकुमारी नेहमी आपल्या वेदना शक्तीमध्ये बदलते.
सोशल मिडियावर दोघांद्वारे केलेल्या या पोस्टमुळे सर्व लोक हैराण आहेत. अनेक प्रकारचे कयास लावले जात आहेत. तथापि चहल आणि धनश्रीने याबद्दल अजूनपर्यंत काहीच वक्तव्य केलेले नाही. धनश्री नुकतेच सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी आणि श्रेयस अय्यरसोबत दिसली होती. त्या फोटोला सूर्यकुमारने शेयर केले होते.
धनश्री आणि चहलने २०२० मध्ये कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात ८ ऑगस्ट २०२० रोजी एंगेजमेंट केली होती. नंतर त्याच वर्षी २२ डिसेंबरला दोघांनी लग्न केले. एंगेजमेंट आणि लग्नाची बातमी त्यांनी सोशल मिडियाद्वारे दिली होती. धनश्री आणि चहल अनेकवेळा इंस्टाग्राम रील्स मध्ये डांस करताना देखील दिसत असतात. धनश्री आईपीएलसोबत टीम इंडियाच्या सामन्यांदरम्यान देखील स्टेडियममध्ये दिसत असते.