सीताफळाचे असेही फायदे असू शकतात यावर तुमचा विश्वास बसणार नाही !

3 Min Read

आंबा, फणस, संत्र्यांसोबत सीताफळ सुद्धा आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मुळचे वेस्ट इंडिज, दक्षिण अमेरिकेचे त्यानंतर ते भारतात आले सीताफळाचे झाड सहज कुठेही माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही केली जाते.

सीताफळामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मूलीना सीताफळ दिल्यास त्यांची उत्तम वाढ होऊन शरीर सुदृढ बनते. सीताफळ खाल्ल्याने शरीरात फायबर, व्हिटॅमिन सी, ओमेगा 3, फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी सारख्या पौष्टिक घटकांचा समावेश असतो. सीताफळ खाणे शरीर आणि हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सीताफळ खाल्ल्याने शरीराचे अनेक गंभीर आजार बरे होतात.

काळे धनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे या समस्या वाढतात. हल्ली अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत. यावर एक उपाय आहे तो म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात. केस गळती रोखण्यासाठी सीताफळाच्या बिया बकरीच्या दूधामध्ये उगाळून लावल्यास फायदा होतो.

त्याचबरोबर सीताफळामध्ये भरपूर मात्रेमध्ये असणारे अ जीवनसत्व केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्या करीता उत्तम आहे. सीताफळाच्या बीया उगाळून लावायच्या झाल्यास बिया लावून डोके एका जाडसर कपड्याने बांधून टाकावे या बिया डोळ्यांना लागु देऊ नये कारण त्यामुळे डोळ्यांची आग होण्याचा संभव असतो. सीताफळाच्या बी ची पूड झोपताना चाळून लावल्यास डोक्यातील उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पुडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यावर केस स्वच्छ व चमकदार होतात. चला सीताफळ खाण्याचे उत्तम फायदे जाणून घेऊया.हाडांसाठी फायदेशीर :- सीताफळमध्ये आढळणारे पोषक घटक हाडे मजबूत होण्यास मदत करतात. कमकुवत हाडांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी सीताफळ घेणे आवश्यक आहे. सीताफळ खाल्ल्याने हाडांची दुर्बलता दूर होते. आणि सांधेदुखीचा त्रासही होत नाही.

दातांसाठी फायदेशीर :-
सीताफळ दात निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करते. सीताफळ खाल्ल्याने दातांमधील कमकुवत आणि पिवळे पणा कमी होतो व दात पांढरे आणि चमकदार बनतात.

हृदयासाठी फायदेशीर :- सीताफळ खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे पोषण मिळण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरात रक्ताचे संचारण चांगले होते. म्हणून, सीताफळ खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. आणि ती व्यक्ती नेहमीच निरोगी राहते.

रक्तदाब साठी फायदेशीर :- सीताफळ खाल्ल्याने शरीरास नायट्रिक अ‍ॅसिड मिळते. जे शरीरातील बीपीवर नियंत्रण ठेवते. म्हणून, उच्च बीपी ग्रस्त लोकांनी सीताफळ घेणे आवश्यक आहे.

अशक्तपणावर मात करणे :- सीताफळ खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. आणि शरीरात रक्ताची कमतरता दूर होते. म्हणून अशक्तपणा ग्रस्त लोकांनी सीताफळ खावे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *