चित्रपट असो किंवा टीव्ही यांवर बाल कलाकार प्रेक्षकांवर एक वेगळीच मोहिनी घालतात. बालकलाकारांचा निरागस अंदाज प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पडण्यास भाग पडतो. अनेक बाल कलाकार खूप लहान वयातच पहिल्यांदा कॅमेरा फेस करतात आणि एका चांगल्या अभिनेता प्रमाणे अभिनय करतात. आपण पण अनेक चित्रपटांमध्ये टीव्ही सीरियल्समध्ये अनेक बाल कलाकार पाहिले आहेत ज्यांचा अभिनय आपल्याला आजही आठवतो.

सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार आणि मुख्य कलाकार म्हणून चित्रपटाच्या दुनियेत यश मिळवले. त्यांच्याप्रमाणे असे अनेक बाल कलाकार नंतर करियर म्हणून अभिनयाचे क्षेत्र निवडतात तर काही बालकलाकार हे इतर क्षेत्रांना करियर म्हणून निवडतात. मात्र आज आम्ही एका बालकलाकाराची तुम्हाला ओळख करून देणार आहोत. ज्याने अनिल कपूरचा चित्रपट जुदाई मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले आणि आज एक नावाजलेला अभिनेता म्हणून बॉलीवूड मध्ये ते नाव कमावत आहे.हा आहे जुदाई चित्रपटातील बालकलाकार :- आज आम्ही जुदाई चित्रपटातील बालकलाकार ओमकार कपूर याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत तो आज एक नावाजलेला अभिनेता आहे. हे तुम्ही सर्वच जाणतात की बाल कलाकारांचा अभिनय चित्रपट सिरीयल ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. अनेकदा चित्रपटाची सिरीयल ओळख पालक कलाकारांमुळे होते. अशाच बालकलाकारपैकी अनेक जण बॉलीवूड मध्ये स्टार झाले आहेत तर काहीजण असे आहेत ज्यांना आपण चित्रपटात पाहतो मात्र ओळखू शकत नाही. की हा बालकलाकार आहे ज्याने अमुक-अमुक चित्रपटांमध्ये भूमिका केली होती.
अशीच ओळख आहे जुदाई चित्रपटातील बालकलाकार ओमकार कपूर यांची. ओमकार आज एक नावाजलेला अभिनेता बनला आहे. मात्र तरीही ही तुम्ही त्याला ओळखू शकत नाहीत. त्याने सध्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून भूमिका केली आहे. खूप कमी लोक आहेत ज्यांनी त्याला ओळखले‌.

त्याची बालकलाकार म्हणून ॲक्टींग पाहून अनेक जण त्याचे फॅन झाले होते. ओमकार आज एक हँडसम अभिनेता म्हणून बॉलीवूड मध्ये नाव कमवत आहे. अनिल कपूरच्या जुदाई चित्रपटात त्याने अनिलच्या मुलाची भूमिका केली होती. हा चित्रपट1997 ला रिलीज झाला होता. आणि त्यावेळी हा चित्रपट सुपरहीट ठरला होता.त्याचा बालकलाकार म्हणून गाजलेला चित्रपट म्हणजे मासूम हा चित्रपट मराठीतील माझा छकुला याचा हिंदीतील रिमेक होता. या चित्रपटातील छोटा बच्चा जान के ना कोई आखं दिखाना रे, हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. त्यावेळी प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी हे गाणे बसले होते. 90 च्या दशकातील पिढीचे लहान वयात हे गाणे फार आवडते गाणे होते.

मासूममधील अभिनयाने ओमकार खूप चर्चेत आला होता. तसेच सलमान खानच्या जुडवा या चित्रपटात त्याने सलमानच्या लहानपणाची भूमिका केली होती.त्यानंतर त्याने चाहत, हीरो नं 1, इंटरनेशनल खिलाडी, मेला अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये बालकलाकारांची भूमिका केली होती. आमीर खान, अक्षय कुमार यांच्यासोबत त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते.प्यार का पंचनामा 2 या चित्रपटातून त्याने बॉलीवूड मध्ये हे मुख्य अभिनेत्याच्या रुपात कमबॅक केले आहे. या चित्रपटात त्याने ‘तरुण’ ही भूमिका साकारली होती. प्यार का पंचनामा 2 चित्रपट आजच्या तरुणाईला प्रचंड आवडला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर प्रचंड यश मिळाले होते. या चित्रपटात अभिषेक कपूर सोबत कार्तिक आर्यन, नुसरत बरूचा यांनी एक्टिंग केली होती. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या विषयावर हा चित्रपट आधारित होता ज्यामुळे तरुणाईला अपील झाला. त्यानंतर ओमकार ने U me aur Ghar आणि जुटा कहीं का असे चित्रपट केले. ओमकार तब्बल 13 वर्ष बॉलीवूडपासून दूर होता.ओमकार आज बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाने पुन्हा लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे. ओमकार एक मेहनती आणि टॅलेंटेड असा अभिनेता आहे. आशा आहे की तो बाल कलाकार म्हणून हिट झाला होता. त्याचप्रमाणे मुख्य कलाकार म्हणूनही यश मिळवले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.