देशी गायीचे तूप खूपच शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे. यामुळे खाण्याशिवाय याचा वापर पूजेमध्ये देखील केला जातो. यासोबत एक हे एक खूप प्रभावी औषध देखील आहे, जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते. औषध आचार्य डॉ अश्विनी सांगतात कि देशी गायीच्या तुपाचा प्रयोग अनेक प्रकारच्या औषधी उपचारांमध्ये केला जातो. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला गायीचे तूप नाकात घालण्याचे औषधी उपचार आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाभांबद्दल सांगणार आहोत.

केस गळती रोखते :- एखाद्या व्यक्तीचे जास्त केस गळत असतील किंवा टक्कल पडण्याची समस्या होत असेल. तर यासाठी गायीच्या तुपाचा उपचार प्रभावी ठरतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी देशी गायीच्या तुपाचे दोन थेंब नाकामध्ये टाकावे. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल. त्याचबरोबर केस वेगाने वाढू देखील लागतील.अ‍ॅलर्जी दूर करते :- अ‍ॅलर्जीच्या समस्येने पिडीत व्यक्तीसाठी देशी गायीचे तूप खूपच लाभदायक असते. याचे दोन थेंब नाकामध्ये टाकल्याने अ‍ॅलर्जीची समस्या दूर होते. याच्या प्रयोगाने तणावामधून देखील आराम मिळतो आणि मानसिक शांती देखील मिळते.

मायग्रेनपासून मुक्ती :- देशी गायीचे तूप मायग्रेनसारख्या समस्येमध्ये देखील फायदेशीर आहे. देशी गायीच्या तुपाचे दोन थेंब सकाळी आणि संध्याकाळी नाकामध्ये टाकल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. अनिद्रासारख्या समस्या देखील दूर होतात आणि रात्री चांगली झोप येते. त्याचबरोबर हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करते.

कोरडेपणा दूर करते :- देशी गायीचे तूप नाकामध्ये टाकल्याने नाकामधील कोरडेपणा कमी होतो आणि ओलावा टिकून राहतो. त्याचबरोबर यामुळे आपला मूड देखील ताजातवाना राहतो.

घोरण्याची समस्या ठीक करते :- अनेक लोकांना रात्री घोरण्याची समस्या असते. वास्तविक असे श्वास नळीतील अडथळ्यामुळे होते. अशामध्ये देशी गायीच्या तुपाचा वापर प्रभावी ठरतो. हे श्वास नळी उघडण्यास मदत करते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी देशी गायीचे तूप कोमट करून त्याचे एक एक थेंब नाकाच्या दोन्ही भागामध्ये टाकावे. यामुळे हळू हळू घोरण्याची समस्या दूर होईल.सर्दीमध्ये फायदेशीर :- सर्दीमध्ये देखील देशी गायीचे तूप खूप उपयोगी ठरते. यासाठी देशी गायीचे तूप थोडे गरम करावे आणि नाकाच्या दोन्ही छिद्रांमध्ये टाकावे. यामुळे सर्दीमध्ये आराम मिळतो.

देशी गायीचे तूप खाण्याचे फायदे :- वरती सांगितलेल्या उपचारांशिवाय जर आपण देशी गायीचे तूप भोजनामध्ये देखील सामील केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होतील. जसे देशी गायीचे तूप खाल्ल्याने हार्ट ब्लॉकेज कधीही होत नाही आणि हृदय नेहमी स्वस्थ राहते. याशिवाय यामध्ये असलेले विटामिन आपली हाडे मजबूत करण्याचे काम करते. गर्भवती स्त्रियांसाठी देशी गायीच्या तुपाचे सेवन करणे अति उत्तम असते. यामुळे होणारे मुल निरोगी, तंदुरुस्त आणि बुद्धिमान होते. लक्षात ठेवा कि गायीचे तूप देशी गायीचेच असायला हवे, तेव्हा याचा संपूर्ण लाभ मिळू शकेल अन्यथा नाही.