आपल्या शरीरामधील पोषक तत्वांची कमी दूर करण्यासाठी दुध खूप जरुरीचे असते. दुधामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक आणि लोह यासारखे पौष्टिक तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे आपले शरीर मजबूत बनते. दुधाच्या सहाय्याने अनेक प्रकारचे डेरी प्रोडक्ट्स देखील बनवले जातात.

यामध्ये दुधापासून बनवलेले पनीर सर्वात लोकप्रिय आहे. लोक हे खूप आवडीने खातात. सामान्यत: हे पनीर गाय किंवा म्हशीच्या दुधापासून बनवले जाते. याच्या दुधापासून बनवलेले पनीर जास्त विकले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का कि जगामध्ये काही भाग असे आहेत जिथे गाढवाच्या दुधाचे पनीर देखील विकले जाते.

७८ हजार रुपये किलो आहे या गाढवीणीच्या दुधाचे पनीर :- भारतामध्ये सामान्य पनीर ३०० ते ४०० रुपये किलोच्या जवळपास मिळते. पण आज आपण अशा गाढवीणीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्या दुधाचे पनीर जवळ जवळ ७८ हजार रुपये किलोने विकले जाते. निश्चितच हि रक्कम ऐकून तुम्ही देखील हैराण झाला असाल.

तुम्ही देखील विचार करत असाल कि या गाढवीणीच्या दुधाच्या पनीरमध्ये असे काय खास आहे ज्यामुळे ते इतक्या महाग विकले जाते. वास्तविक या पनीरमध्ये काही असे विशेष गुण आहेत ज्यामुळे जगभरामध्ये याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. पण याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर काहीच देशामध्ये याचे उत्पादन केले जाते.

या देशामध्ये बनते पनीर :- गाढवाच्या दुधाचे पनीर यूरोपीय देश सर्बियामध्ये बनवले जाते. याचे उत्पादन उत्तरी सर्बियामध्ये स्थित जैसाविका नावाच्या फार्ममध्ये केले जाते. या फार्ममध्ये २०० पेक्षा जास्त गाढवे पाळली गेली आहेत. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि एक गाढवीण दिवसभरामध्ये एक लिटर देखील दूर देत नाही.

जर भारतामधील जर्सी गायींबद्दल बोलायचे झाले तर त्या २४ तासामध्ये ३० लिटर पर्यंत दुध देतात. तथापि या गाढवांमध्ये इतकी क्षमता नसते. इतकेच कमी दुध देऊन देखील यापासून बनलेले पनीर खूप महाग असते. उदाहरण म्हणून फार्ममध्ये जितके देखील गाढवे आहेत त्यांच्या दुधापासून फक्त १५ किलो पनीर तयार होते.

या जातीच्या गाढवांचे दुध असते पौष्टिक :- हे महागडे आणि पौष्टिक पनीर फक्त बाल्कन जातीच्या गाढवांच्या दुधापासून बनवले जाते. या जातीची गाढवे सर्बिया आणि मांटेनेग्रोमध्येच आढळतात. सर्बियाचे पनीर उत्पादक सांगतात कि एक गाढवीण आणि मानवी आईच्या दुधामध्ये एकसारखे गुण आढळतात. हेच कारण आहे कि या जातीच्या गाढवांचे दुध इतके पौष्टिक मानले जाते.

या रोगामध्ये मिळतो लाभ :- बाल्कन जातीच्या गाढवांच्या दुधाच्या पनीरच्या सेवनाने अस्थमा आणि ब्रॉन्कायटीसच्या रुग्णांना चांगला फायदा होतो. याशिवाय ज्या लोकांना गायीच्या दुधाने अॅलर्जी होते ते देखील गाढवाच्या दुधाच्या पनीरचा वापर करतात. या खास पनीरचे खूपच कमी प्रमाणात उत्पादन होते यामुळे याची किंमत अधिक असते. २०१२ मध्ये हि बातमी आली होती कि सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविच याच पनीरचा वापर करतो. हि बातमी व्हायरल झाल्यानंतर हे खास पनीर पूर्ण जगामध्ये चर्चेचा विषय बनले होते. तथापि जोकोविचने या बातमीचे खंडन केले होते.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.