कमी खाणे आणि योग्य व्यायाम न केल्यामुळे रक्तवाहिन्यांमधे घाण जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे तुम्हाला कोरोनरी आर्टरी रोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका संभवतो. शरीराच्या उत्तम कार्यासाठी आणि रक्तभिसरण योग्यरित्या होण्यासाठी रक्तवाहिन्या निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. रक्ताभिसरण बंद झाल्यास, कार्यावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात बरेच रोग होतात. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या म्हणण्यानुसार ,जगात सर्वाधिक मृत्यू हृदयविकारांमुळे होतो. हृदयरोगाचे एक मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये घाण साचणे, ज्यास वैद्यकीय भाषेत “प्लेक” असे म्हणतात.

रक्तवाहिन्या ह्या ऑक्सिजनयुक्त -समृद्ध रक्त हृदयापासून शरीराच्या विविध अंगापर्यंत घेऊन जातात. प्लेकच्या निर्मितीमुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका असू शकतो. रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजमुळे “या” रोगांचा संभवतो धोका. रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यास तुम्हाला कोरोनरी आर्टरी रोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. रक्तवाहिन्यांत जमा होणारी घाण रक्तामध्ये फिरत असलेल्या विविध घटक पदार्थांपासून बनलेली असते.यामध्ये कॅल्शियम, चरबी, कोलेस्ट्रॉल, सेल्युलर आणि फायब्रिन, रक्ताच्या गुठळ्या इत्यादी समाविष्ट असतात. जर रक्तवाहिन्यात ब्लॉकेज असतील तर आपणास ठराविक भागात गाठ, जळण होऊ शकते. रक्तवाहिनी ब्लॉक होण्यापासून रोखण्यासाठी तज्ञ मंडळी आपणास योग्य व्यायाम करणे आणि निरोगी आहार घेण्याचे सल्ले देतात. तुम्ही आपल्या अन्नामध्ये या गोष्टींचा समावेश करुन या त्रासातून मुक्त होऊ शकता. या झाडाची ४ पाने फक्त काही दिवसात चघळा, रक्तवाहिन्यांत जमा झालेली घाण स्वच्छ होईल, हृदयविकाराचा झटका देखील टळेल.

कडुलिंबाची पाने :- कडूलिंबाची पाने बर्‍याचदा अनेक औषधांमध्ये वापरली जातात. कडुलिंबाच्या पानांची बारीक पावडर करून चेहर्‍यावर लावा, यामुळे त्वचेला चमक येते आणि डाग दूर होतात. अर्थात या पानांची चव फार कडू असते पण जर तुम्ही दररोज सकाळी कडुलिंबाची पाने चघळायला सुरुवात केली तर तुम्हाला फार कडू चव लागणार नाही. कडूलिंबाचा उपयोग हृदयरोग आणि संबंधित आजार समस्या दूर करण्यासाठी दीर्घ काळापासून केला जात आहे.

बर्‍याच अभ्यासकांनी असा दावा केला आहे की, हृदयाशी संबंधित समस्या आणि आजार बरे करण्यास कडुलिंब प्रभावी आहे. कडुलिंब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास, रक्ताच्या गुठळ्यावर उपचार करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. कडुलिंबाच्या पानांमध्ये निंबिडिनसारखे मिश्रण असलेले अँन्टीहिस्टामाइन असते, जे रक्तवाहिन्यांना पातळ करण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयावरील ताण कमी करण्यास मदत करते.शतावरी :- शतावरी आपल्या रक्तवाहिन्या शुद्ध करणारे उत्तम पदार्थ आहे. फायबर आणि मिनरल्स समृद्ध असे रक्तदाब कमी होण्यास आणि रक्त गुठळ्या टाळण्यास मदत होते, ज्यामुळे गंभीर हृदयरोग होऊ शकतो. हा धोका टाळण्याचा प्रयत्न शतावरी करते.अ‍वोकाडो :- अवोकाडो खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन ई देखील आहे, जे कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन रोखते, तसेच पोटॅशियम, ज्यास कमी रक्तदाब म्हणून ओळखले जाते.खरबूज :- खरबूज हे अमिनो आम्ल, एल सिट्रुलाइन यांचे एक उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहे. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देते, जळजळ ,सूज कमी करते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.हळद :- हळदीत कर्क्यूमिन नावाचे अँटी इंफ्लेमेंटेरी गुणधर्म समाविष्टीत असतात. हळदीमुळे रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यांना देखील कमी करते. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या कमी होऊ शकतात आणि प्लेग कमी तयार होऊ शकतात. हळदमध्ये व्हिटॅमिन बी ६ देखील असते, जे होमोसिस्टीनचे निरोगी स्तर राखण्यास मदत करते. असे अनेक आरोग्यसंबधित लेख वाचण्यासाठी लाइक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.