आज-काल जमाना एवढा खराब आहे ते कोणाचा कोणावरी भरोसा नाही भाऊ भावाचा नसतो. मुलं आपल्या आईवडिलांची नसतात. आजकाल तुम्ही खूप अशा गोष्टी ऐकत असाल की मुलांनी वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले.त्यामुळे ते आई-वडिलांना कुठलातरी वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. काहीवेळा तर एकटेपणा तच आपले जीवन व्यतीत करावे लागते. म्हातारपण हा असा काळ असतो.ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांची सर्वात जास्त गरज असते. परंतु काही निर्दयी मुलं अशावेळी आपल्या आई-वडिलांना धोका देतात आपली जबाबदारी पार पडत नाहीत. ते विसरून जातात कियास आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले असते. आज जे तुम्ही आहात त्यांच्यामुळेच आहात.

या कारणामुळे मुले आपल्या आई-वडिलांसोबत राहत नाहीत :- जाणून घेऊयात असे कोणते कारण आहे.ज्यामुळे मुले आपल्या आई-वडिलांना सोडून वेगळे होतात. मुख्यतः ही समस्या लग्न झाल्यानंतर सुरू होते. नवीन सुनेचे सासू सासऱ्यांशी पटत नाही.रोज घरात भांडणे होऊ लागतात. तुमच्या मुलांचे विचार यांमुळे तुमच्याशी पटत नाही. काहीवेळा तुम्ही त्यावर जास्त नियम लादतात. किंवा त्यांना जास्त स्वातंत्र्य हवे असते.अशावेळी चूक कोणाची असू शकते. मात्र अशा प्रसंगातूनच कुटुंबात दरी पडू लागते. आईवडिल जेव्हा वृद्ध होतात. तेव्हा त्यांना अनेकदा आजार होतात. अशावेळी औषधोपचाराचा खर्च येतो.तसेच त्यांची सेवा करावी लागते.अशा परिस्थितीतून वाचण्याकरिता अनेक कृतघ्न मुलं, सुना आई-वडिलांना आपल्यापासून वेगळे करण्याचे प्लॅनिंग करतात. सर्वात मोठे कारण हे प्रॉपर्टी आणि पैसा असतो. काही स्वार्थी मुलांना आपल्या आई-वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये फार रस असतो.एकदा हि प्रॉपर्टी त्यांच्या कब्ज्यात आली कि ते आई-वडिलांना बाहेर काढतात. काहीवेळा घराच्या हिश्श्यांवरुनही भांडणे होतात.आई-वडिलांनी ही सावधानता बाळगली पाहिजे :- जर तुम्हाला तुमचे म्हातारपण हे आराम आणि शांतीने जगायचे असल्यास या गोष्टींना ध्यानात ठेवा. आपल्या आरोग्य प्रति जाग रहा. स्वस्थ, तंदुरुस्त राहण्याचा सतत प्रयत्न करा. त्यामुळे म्हातारपणात तुम्ही स्वतःचे काम स्वतः करू शकाल तसेच वेळोवेळी हेल्थ चेकअप करत रहा. आपल्या जुना विचारांना थोडे बदला आणि मुलं सुनांना स्वातंत्र्य द्या त्यांच्या वैयक्तिक कामांमध्ये जास्त दखल अंदाजी करू नये.तुम्ही फक्त तुमच्याबद्दल विचार करा. मुलं मोठी झालेली आहेत त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या.कोणत्याही परिस्थितीत आपली प्रॉपर्टी मुलांच्या नावावर अगोदरपासूनच करू नका.आपले सर्व बँक अकाउंट आणि एटीएम इत्यादी स्वतः वापरा. जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत पूर्ण कुटुंब तुमच्या मुठीत आहे.जर त्यांनी तुम्हाला सोडलं तरी तुम्ही या पैशांच्या जोरावर चांगले आयुष्य जगू शकतात. कोणत्याही आजारावर औषधोपचार करू शकाल. त्यामुळे एक मोठी सेविंग आपल्या म्हातारपण हा करिता करून ठेवा ज्यामुळे मुलांवर तुमचा खर्च येणार नाही तुमचे घर तुमच्या स्वतःच्या नावावरच ठेवा.

यासंबंधी प्रकरण :- ज्यांनी जन्म दिला, खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले व लग्नकार्य करून संसार थाटून दिले, त्या आई-वडिलांचा वृद्धापकाळी मायेने सांभाळ करण्याऐवजी मानसिक छळ करून त्यांची जीणे हराम करणाऱ्या पुण्यातील निगडी येथील दोन मुलांना उच्च न्यायालयाने कायद्याचा बडगा दाखवून घराबाहेर काढले आहे. ‘एवढेच नव्हे, तर या दोन्ही मुलांनी त्यांच्या आई-वडिलांना आॅगस्ट महिन्यापासून निर्वाहासाठी दरमहा प्रत्येकी २,५०० रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला. जबरदस्तीने वडिलांच्या घरात बिऱ्हाडे थाटलेल्या या दोन्ही मुलांनी येत्या दोन आठवड्यांत बायकामुलांसह चंबुगबाळे आवरून जागा खाली केली नाही, तर पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर हुसकावले जावे,’ असेही न्यायालयाने सांगितले.मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर वारसाहक्क न सांगता, म्हातारपणी त्यांचा सांभाळही करावा, या उद्देशाने संसदेने सन २००७ मध्ये केलेल्या ‘मेन्टेनन्स अँड वेल्फेअर आॅफ पॅरेन्ट्स अँड सीनियर सिटिझन्स अॅक्ट’ या कायद्याच्या आधारे न्या. साधना जाधव यांनी हा आदेश दिला.