आज आम्ही तुम्हाला पोस्टमधून भारतातील सर्वात महागड्या डॉक्टर्स बद्दल सांगणार आहोत. ऑपरेशन करून, किंवा अन्य तपासणी द्वारे हे डॉक्टर्स खूप कमाई करतात. चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत हे डॉक्टर.
डॉ. सुधांशु भट्टाचार्य – सुधांशु हे एक सर्जन आहेत. ते एक ऑपरेशन करण्यासाठी तब्बल 14 ते 15 लाख रुपये फी घेतात. यांचे क्लिनिक दक्षिण मुंबईमध्ये आहे. यांच्याकडे पेशंट म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन व महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल पीसी अलेक्जेंडर यायचे. नव्वदच्या दशकात डॉक्टर सुधांशू हे सर्वाधिक टॅक्स भरणारे डॉक्टर म्हणून ओळखले जायचे शिवाय त्यांच्या क्लिनिकमध्ये वेटिंग लिस्ट नेहमीच फुल असायची.
डॉ. एस नटराज – डॉक्टर नटराज डोळ्यांचे स्पेशालिस्ट आहेत. बॉम्बे हॉस्पिटल मध्ये मुख्य सर्जन म्हणून ते काम करतात. तेथे कॉन्ट्रॅक्ट बेस वर असून हॉस्पिटलकडून ते दरमहा ७० लाख रुपये घेतात. डॉक्टर नटराज यांनी वेगवेगळ्या कलाकारांचे तसेच विदेशी लोकांचे व मोठमोठ्या व्यक्तींचे उपचार केले आहेत. त्यांची कमाई इतर डॉक्टरांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
डॉ. राकेश कुमार माथुर – डॉक्टर राकेश हे एक रेडिओलॉजिस्ट आहेत. पॅड मॅक्स हॉस्पिटल मध्ये कॅन्सर पिडीत लोकांवर उपचार करतात. डॉक्टर राकेश हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ऑपरेशन साठी दहा लाख रुपये फी घेतात.
डॉ. नरेश त्रेहान – सध्याच्या काळात सर्वाधिक टॅक्स भरणारे डॉक्टर म्हणून डॉ. नरेश त्रेहान आघाडीवर आहेत. डॉक्टर नरेश इतर डॉक्टरांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच महिन्याला तीनशेहून अधिक सर्जरी करतात. डॉ. नरेश यांच्या क्लायंट लिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन ते मुकेश अंबानीं सारख्या मोठ्या व्यक्ती सहभागी आहेत. डॉ. नरेश स्वतः मेदांता हॉस्पिटल चे मालक आहेत. व या हॉस्पिटल मधील महत्त्वपूर्ण ऑपरेशन ते स्वतः करतात.
डॉ. बालामुरली अंबाती – डॉक्टर अंबाती हे सर्वात तरुण डॉक्टर असून वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षापासून त्यांनी युनायटेड स्टेट मधून मेडिकल संबंधित शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर अंबाती गरजू लोकांना स्वस्त उपचार करून त्यांच्यावर इलाज करतात. एका ऑपरेशन साठी दहा लाख रुपये फी घेतात.
डॉ. देवीप्रसाद शेट्टी – डॉ. देवीप्रसाद हे बेंगलोर मधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉक्टर देवीप्रसाद यांची एक खासियत आहे ती म्हणजे ते श्रीमंत लोकांवर इलाज करून जमा झालेला पैसा गरीब लोकांच्या उपचारासाठी वापरतात. ते प्रत्येक ऑपरेशनमधून पंधरा ते वीस लाख रुपये फी घेतात व तोच पैसा गरिबांसाठी वापरतात. नुकतेच त्यांनी सर्वाधिक सर्जरी करून त्यांच्या नावावर रेकॉर्ड बनवला आहे.