महिला आणि पुरुषांचा चेहरा तर साफ आणि गोरा असतोच पण अनेक गोऱ्या आणि सुंदर लोकांची हि तक्रार असते कि त्यांचा चेहरा सुंदर तर आहे पण त्यांचा गळा खूप काळा आहे. आपला गळा सतत सूर्याच्या संपर्कामध्ये येऊन काळा होतो. चेहऱ्यावर सुंदरता आणण्यासाठी आपण फेस पॅक लावतो आणि गळा तसाच सोडून देतो.

यामुळे पिगमेंटेशन आणि टॅनिंग होते ज्यामुळे गळा काळा पडतो. आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या गळ्याचा काळेपणा सहजपणे दूर करू शकतो. चला तर जाणून घेऊया गळ्यावरील काळेपणा दूर करण्याचे सोपे उपाय.

बदाम आणि दूध :- गळा साफ करण्याचा सोपा उपाय आहे स्क्रब. स्क्रब बनवण्यासाठी सर्वात पहिला २ चमचे बदाम पावडर घ्या आणि नंतर त्यामध्ये तीन चमचे दुध टाका आणि दोन्हींची चांगली पेस्ट बनवून घ्या. तयार झालेली पेस्ट आपल्या गळ्यावर लावा आणि १५ मिनिटे मसाज करा. स्क्रब चांगली सुखु द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

लिंबू आणि मध :- दोन चमचे लिंबाच्या रसामध्ये मध मिसळून त्याची चांगली पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट आपल्या गळ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. लक्षात ठेवा धुतेवेळी आपला गळा मसाज करावा ज्यामुळे घाण साफ होईल.

बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा त्वचे मध्ये नैसर्गिकरित्या सुंदरता आणते आणि हळू हळू गडद रंग हलका करते. तीन चमचा बेकिंग सोड्यामध्ये एक चमचा पाणी मिसळून याची चांगली पेस्ट बनवून घ्या. आता हे पॅक गळ्याच्या गडद रंगाच्या ठिकाणी लावा आणि पाण्याने धुवून टाका.

बटाटा, दुध आणि नारळ तेल :- घरामध्ये आपण भाजी बनवण्यासाठी नेहमी बटाट्याचा वापर करत असाल आणि आपल्या केसांना नारळ तेल अवश्य लावत असाल. पण तुम्हाला माहिती आहे का कि या वस्तू तुमचा गळा स्वच्छ करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.

एक चमचा बटाट्याचा रस, एक चमचा दुध आणि नारळाच्या तेलाचे काही थेंब, हे सर्व एकत्र मिसळून याची चांगली पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट आपल्या गळ्यावर लावून काही वेळ मालिश करा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका.