डोळ्यांचं फडफडणं म्हणजे आपल्याला मिळणारा शुभ, अशुभ संकेत असतो, असे अनेकजण मानतात. प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की, जर डावा डोळा फडफडला तर आपल्यासोबत काहीतरी शुभ घडणार आणि जर का उजवा डोळा फडफडला तर काहीतरी अशुभ घडणार. परंतु डोळा फडफडणं आणि शुभ, अशुभ घडणं या दोन गोष्टींचा वास्तविक काहीही संबंध नाही, ही केवळ एक अंधश्रद्धा असल्याचे आपण म्हणू शकतो. डोळ्यांचे फडफडणे हे पूर्णपणे शारीरिक त्रासावर अवलंबून असते. डोळ्यांचे फडफडणे ही एक सामान्य गोष्ट असून थोड्या वेळानंतर आपोआप शांत होते.

डोळ्यांचा फडफडण्यामागचे मुख्य कारण हे तणाव व थकवा असू शकतो. काही वेळेस फार वेळ संगणकावर काम केल्याने, पुस्तकं वाचल्याने, मोबाईलचा अतिवापराने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. काही वेळेस डोळ्यातील ओलावा कमी झाल्याने ही समस्या उद्भवू शकतो. कॉफीन आणि दारूच्या अतिसेवनामुळे देखील डोळा फडफडतो. आपण जर का कॉफी, चहा, सोडा, मद्य याचे अतिसेवन करत आहात तर हा त्रास आपल्याला नक्की होऊ शकतो. डोळ्यांचं फडफडणं म्हणजेच डोळ्याची पापणी फडफडणे, जेव्हा डोळ्याचा मांसपेशी आक्रसल्या जातात तेव्हा हा त्रास होतो.यावर उपाय म्हणजे जितकं शक्य असेल तितके घट्ट डोळे मिटून उघडणे, ही क्रिया तोपर्यंत करत राहावी जोपर्यंत आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही. डोळ्यातून पाणी आल्याने डोळ्यांमध्ये आद्रता निर्माण होते ज्यामुळे पापण्यांना आराम मिळतो. डोळ्याच्या आणि चेहर्‍याच्या स्नायूंना नियंत्रित करण्यासाठी आपल्या मधल्या बोटाने खालच्या पापणीवर मालिश करावे. ज्या डोळ्याची पापणी फडफडत असेल त्या पापणीला 30 सेकंद मालिश करावे. या उपायामुळे रक्त प्रवाह ही वाढतो आणि डोळ्याचा मांसपेशी मजबूत होतात. पापणीचा फडकण्याने डोळ्याचा मांसपेशींना आराम मिळतो.

पापण्या सारख्या मिचकवल्याने डोळे स्वच्छ राहतात सोबतच ओलावा ही टिकून राहतो. डोळ्यांचा व्यायामासाठी डोळे काही काळासाठी बंद ठेवावे. डोळे बंद करत असतानाच ते घट्ट मिटावे आणि काही काही सेकंदानंतर डोळे न खुलता हलके सोडावे. ही क्रिया तीन वेळा केल्याने फक्त डोळ्यांना आरामचं मिळत नाही तर सोबत डोळ्यांचा मांसपेशी मजबूत होतात. डोळ्यांचा सुमारे चार – पाच ठिकाणी मालिश करावे. ऐक्यूप्रेशरमुळे रक्त प्रवाहाला चालना मिळते आणि डोळ्यांचे फडफडणे थांबण्यास मदत होते.वरील क्रिया शांतपणे करत असताना डोळ्यांचा पापण्या विभिन्न प्रकारे फडफडताना जाणवतात. फडफड थांबेपर्यंत आपण करत असलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रोज रात्री 7 te 8 तास झोप ही मानवी शरीरासाठी आवश्यक असते. त्यामुळे रात्रीचा वेळेत टीवी, मोबाइल, कम्प्यूटर या उपकरणांचा वापर कमीत कमी करावा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल, थकव्यामुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होईल.