भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीसाठी लाखो मुली दिवान्या आहेत. विराट कोहलीने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. पण लग्नाच्या अगोदर विराट कोहलीचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेयर राहिले आहे. विराट कोहली खूपच जास्त हँडसम दिसतो आणि त्याचे लाखो प्रशंसक आहेत. आज आम्ही तुम्हाला विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत जी त्याच्यावर खूप प्रेम करत होती.

विराट कोहलीने जेव्हा भारतीय क्रिकेट संघामध्ये प्रवेश केला आहे तेव्हापासून तो यश मिळवत आहे आणि आज विराट कोहली भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये लोकप्रिय झाला आहे. विराट कोहलीचे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. फॅन्स त्याची एक झलक मिळवण्यासाठी खूपच उत्सुक असतात.विराट कोहलीचे नाव ब्राझीलची मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेलसोबत सुद्धा जोडले गेले होते. इजाबेलने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. तलाश चित्रपटामध्ये ती आपल्याला पाहायला मिळाली होती जो २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. इजाबेल आणि विराट कोहलीची भेट एका अॅाड शूटच्या वेळी झाली होती. यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले आणि २ वर्षांपर्यंत त्यांचे हे नाते राहिले. मात्र काही कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.२०१३ मध्ये एका मुलाखतीदरम्यान इजाबेल म्हणाली होती कि ती २ वर्षांपर्यंत कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. इजाबेल विराटला भेटण्यासाठी ब्राझीलहून साता समुद्रापार भारतात येत असे. पण दोघेही काही काळानंतर वेगळे झाले दोघांचे मार्गदेखील वेगळे झाले.