या जगामध्ये अनेक लोक तल्लख बुद्धीचे आहेत. काही लोक स्वतःलाच तल्लख बुद्धीचे समजतात. अशाच तल्लख बुद्धीच्या लोकांसाठी आम्ही एक फोटो घेऊन आलो आहोत. जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्याच बुद्धीवर शंका घेऊ लागाल. आम्ही जो फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यामध्ये एक गुप्त संदेश लपला आहे. जर तुम्ही या फोटोमधील गुप्त संदेश शोधून काढला तर तुम्हाला देखील जीनियस समजले जाईल.

तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारायला आवडेल काय. काळे ठिपके असलेल्या फोटोला पाहून भल्याभल्यांची भांबेरी उडाली आहे. अनेक लोक रात्रंदिवस हा फोटो पाहत आहेत तरीही फोटोमध्ये लपलेला संदेश शोधण्यात ते अपयशी झाले आहेत. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच डोळ्यांना धोखा देणाऱ्या या फोटोमध्ये जो संदेश लपला आहे तो सहजपणे डोळ्यांना दिसत नाही. यासाठी खूपच एकाग्रतेने फोटोकडे लक्षपूर्वक पहावे लागते.

हा फोटो पाहून लोकांचे डोके चक्रावून गेले आहे. लोकांना हे समजत नाही आहे कि फोटोमध्ये गुप्त संदेश कुठे दडला आहे. कदाचित तुम्हाला पहिल्या नजरेमध्ये असे वाटेल कि आम्ही तुम्हाला मूर्ख बनवत आहोत. पण हा फोटो एकदम ओरिजिनल आहे आणि यामध्ये खरेच एक गुप्त संदेश लपला आहे.

जर तुम्हाला फोटोमध्ये दडलेला संदेश दिसत नसेल तर तुम्हाला अजून प्रयत्न करावा लागेल, कारण फोटोमध्ये दडलेला संदेश शोधणे इतके सोपे नाही. अजून देखील तुम्हाला संदेशाबद्दल माहिती झाले नसेल तर आपला फोन चेहऱ्यापासून दूर ठेवा. आता तुम्हाला तो संदेश दिसला का ? जर अजून देखील दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो फोटोमध्ये काय लिहिले आहे. फोटोमध्ये लिहिले आहे कि ‘HIDE AND SEEK’
लहानपणी तुम्ही ‘HIDE AND SEEK’ खूप खेळले असेल. या खेळामध्ये एक खेळाडू आपले डोळे बंद करतो आणि आकडे मोजतो. यादरम्यान बाकीचे खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी लपतात. खेळाच्या दुसऱ्या भागामध्ये डोळे बंद करणारा खेळाडू इतर लपलेल्या खेळाडूंना शोधतो.