स्टार प्रवाहवरील स्वप्नांच्या पलिकडले सिरीयलमधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेली प्रसिद्ध अभिनेत्री गौरी नलवडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वप्नांच्या पलिकडले सिरीयलमधील वैदेही आज देखील दर्शकांच्या लक्षात आहे. खूपच कमी काळामध्ये तिने दर्शकांची मने जिंकली होती. सिरीयलसोबत चित्रपटांमधून देखील ती दर्शकांच्या भेटीला आली.

गौरीच्या आईवडिलांसोबत आणखी एक व्यक्ती तिच्या नेहमी पाठीशी असायची ती म्हणजे छोटू दादा. अनेक वर्षे गौरीच्या पाठीशी उभे असलेल्या छोटू दादाचे निधन झाले आहे. त्याच्या जाण्याचे कारण अद्यापही अभिनेत्रीने सांगितलेले नाही. सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेयर करून गौरीने हि दुखद बातमी दिली आहे.

छोटू दादाच्या अचानक एक्झीटमुळे गौरीला फार मोठा धक्का बसला आहे. गौरीचेच नाही तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेकांचे ते लाडके होते. छोटू दादाच्या निधनाची बातमी देताना गौरी खूपच भावूक झाली. भावूक होत गौरी म्हणाली कि, मॅडम मी विचारल्या शिवाय कुठेच जाणार नाही म्हणाले होता, आहेत तिथे चांगले राहा छोटू, आई-बाबा, निकिताची काळजी करू नका, आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे.

गौरीने शेयर केलेल्या या पोस्टमुळे हे समजते कि ते तिच्यासाठी किती महत्वाचे होते. छोटू दादाच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सुयश टिळक, हृता दुर्गुळे, इशा केसकर, शर्वरी जोग सारख्या दिग्गज कलाकारांनी छोटू दादाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri🌸 (@gaurinalawadeofficial)

समीर चौगुलेने म्हंटले आहे कि हे खूपच धक्कादायक आहे, २ चित्रपटाच्या इवेंटसाठी सोबत होता, अत्यंत गोड स्वभावाचा होता. सिनेसृष्टीतीलमधील सर्वच कलाकारांच्या खूपच जवळचे होते छोटू दादा. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.