या पद्धतीने घरच्या घरी करा तेलाने मालिश, तुमचे केस गळणार नाहीत !

3 Min Read

केस म्हणजे प्रत्यकाचा जीव की प्राण असतात. मग ते कसे ही असोत, कुरळे, पांढरे पण ते डोक्यावर असणे अतिशय आवश्यक असते. केसांमुळे व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडत असते. त्यामुळे डोक्यावर असणारे केस जपण्यासाठी जो तो धडपडत असतो.

Hair Care Tips :- केसांच्या मजबुतीसाठी जेवणात डाळ, सोयाबीन, पनीर, दूध यांचा समावेश असावा. गर्भवती महिलांमध्ये रक्ताची कमतरता होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते कारण यामुळे केस गळू लागतात. केस चमकदार, मजबूत आणि मोकळे असतील तर ते हेल्दी हेयर आहेत असं म्हटले जातं. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात केस गळणे आणि ऐन तारुण्यात केस पांढरे होणे ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.

शरीरात पोषक घटकांची कमी असल्यास केस कमजोर होऊन गळू लागतात. अनेकदा केसांना कलर करणे आणि वेगळा लूक देण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारांचा अवलंब करतो. यामुळे सुद्धा केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. ताणतणावामुळे शरीराच्या तापमानात असंतुलन निर्माण होते आणि त्यामुळे केस पांढरे होतात.

हि आहेत कारणे :- टक्कल पडणे केस गळणे आणि केस पांढरे होणे यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात डायटिंग सुरू केले जाते, डायटिंगच्या नादात अचानक कमी केलेला आहार आपल्या शरीरातील पोषक घटकांवर डायरेक्ट परिणाम होतो. यामुळे शरीरातील पोषक घटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते, याशिवाय धूम्रपान करणे थायरॉईड डिसऑर्डर, सर्दी, खोकला हे वारंवार होत असल्यास सुद्धा केस गळण्याची समस्या निर्माण होते. केसांमध्ये सतत कोंडा निर्माण होत असल्यास सुद्धा केस गळू लागतात. कोंड्यापासून सुटका करण्यासाठी आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा शॅम्पूचा वापर करणे फायदेशीर ठरते.

असे थांबवा केसांचे गळणे :- केसांच्या मजबूतीसाठी जेवणात डाळ, सोयाबीन, पनीर, दूध यांचा अधिकाधिक समावेश करावा. टकलेपणावर शेवटचा उपाय म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे. यामध्ये डोक्यावरील मागच्या आणि बाजूच्या भागातील केस काढून केस असलेल्या जागी लावले जातात. केसांच्या बाहेरच्या भागाला क्युटिकल असे म्हटले जाते. जे मशीनच्या वापरामुळे खराब होतात, त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर कमी प्रमाणात करणे फायद्याचे ठरते.

घरगुती उपाय करा :- केसांची मजबुती हाडांच्या मजबुतीवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर दोन्ही हातांनी केसांवरून हात फिरून त्यांना झटकण्याची बऱ्याच जणांना सवय असते, मात्र असे करू नये असे केल्याने मोठ्या प्रमाणात केस गळणे ही समस्या निर्माण होऊ शकते. जेवणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन सोबतच देशी गाईचे तूप, हिरव्या पालेभाज्या, गाजर दुधी भोपळा, पालक मोठ्या प्रमाणात खाव्यात. देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत. आयुर्वेदिक तेल भृंगराज किंवा अन्य तेल कोमट करून केसांवर मालिश केल्याने सुद्धा केस गळतीची समस्या दूर होते.

घाबरू नका :- एका दिवसात कमीत कमी शंभर केस गळत असतील तर काळजी करण्याची काही आवश्यकता नाही, हे असे केस असतात त्यांचं वय पूर्ण झालेलं असतं किंवा त्यांची क्षमता संपलेली असते. जे केस गळल्यानंतर त्या जागी नवीन केस उगवतात. मात्र याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात केसांची गळती होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. केसांच्या मजबुतीसाठी त्यांच्या मुळाला पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी दररोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि तेलाची मालिश करणे गरजेचे असते. केस धुण्याआधी तेलाने मालिश अवश्य करावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *