जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस साजरा करणे कोणाला नाही आवडत. दरवर्षी प्रत्येक व्यक्ती आपल्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. यानंतर ते आपला वाढदिवस कुटुंबीयांसह आणि मित्रांसह मोठ्या उत्साहात साजरा करतात. आपल्या प्रत्येक वाढदिवशी प्रत्येक व्यक्ती हा विचार करते कि त्याचे येणार आगामी वर्ष आणखीन आनंदी आणि चांगले जावे. त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख कमी व्हावे आणि नशीब नेहमीच साथ द्यावे. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा वाढदिवसाला शुभ आणि लाभदायी बनवण्याचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. जर तुम्ही शास्त्राच्या नियमानुसार वाढदिवस साजरा कराल तर तुमचे येणारे वर्ष चांगले भाग्य आणि चांगले आरोग्य घेऊन येते. यामुळे तुमचे पूर्ण वर्ष चांगले जाते. चला तर जाऊन घेऊया तुम्ही तुमचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा करायला हवा.

मेणबत्ती विझवू नका :- सनातन मान्यतेनुसार वाढदिवशी मेणबत्ती किंवा दिवा विझवणे खूप अशुभता आणते. असे केल्याने नरकाचे द्वार पहावे लागते. यासाठी चांगले हेच आहे कि तुम्ही जितक्या वर्षाचे आहेत तेवढ्या मेणबत्त्या विझवण्याऐवजी तितकेच मंदिरामध्ये दिवे प्रज्वलित करावे. यामुळे तुमचे येणारे वर्ष पॉजिटिव राहील.या वस्तू खाऊ नयेत :- वाढदिवशी चुकुनही मांस, मच्छी खाऊ नये. या दिवशी तुम्ही आपले एक वर्ष आणि जिवंत राहणे साजरे करत असता. अशामध्ये दुसऱ्या जीवाला मारून खाणे चुकीचे आहे. असे करणे पाप आहे. शास्त्रानुसार तर आपल्या वाढदिवशी मद्यपान सुद्धा करू नये. अशी मान्यता आहे कि वाढदिवशी मद्यपान केल्यास किंवा मांस खाल्ल्यास येणारे वर्ष वादांनी आणि रोगांनी वेढलेले राहते.
असे करू नये :- शास्त्राच्या मानण्यानुसार वाढदिवशी चुकुनही गरम पाण्याने अंघोळ करू नये. हि कृती आपल्या ग्रहांवर विपरीत परिणाम टाकते. यामुळे वाढदिवशी सकाळी सकाळी गंगाजल मिसळून साध्या पाण्याने स्नान करावे. याद्वारे तुम्ही पूर्ण शुद्ध आणि पवित्र होता.यांचा आशीर्वाद जरूर घ्यावा :- आपल्या वाढदिवशी देवी देवता, गुरु आणि आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायला कधीच विसरू नये. वाढदिवशी यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास येणारे वर्ष आनंदाने भरलेले असते. यामुळे तुमचे नशीब सुद्धा तुमची साथ देते.
दान करावे :- आपल्या वाढदिवशी दान धर्म करण्याचे विशेष महत्व आहे. यादिवशी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करावे. याशिवाय एखाद्या गरीबाची किंवा गरजूची मदत करावी. असे केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि तुम्हाला इच्छित फळ देतात.यांचा अपमान करू नका :- वाढदिवशी चुकुनही कोणाचा अपमान करू नये. मग तो तुमचा चांगला मित्र, नातेवाईक, मुले ई. किंवा शत्रू असो. या दिवशी सर्वांसोबत चांगला व्यवहार करावा. विशेषतः गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला वाढदिवशी कष्ट दिल्याने शनिदेव नाराज होतात. याचे कारण हे आहे कि शनिदेव त्यांचे प्रतिनिधित्व करतात.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.