जाणून घ्या नाकावरून पुरुषांचा स्वभाव कसा ओळखायचा !

5 Min Read

मानवी सौंदर्यात नाकाला विशेष महत्त्व दिले जाते. परंतु हे नाक फक्त सौंदर्यच खुलवत नाही तर माणसाचा स्वभाव देखील दाखवते. जर तुम्हाला एखाद्या पुरुषाचा स्वभाव ओळखायचा असेल तर तुम्ही त्या पुरुषाचे नाक निरखून पहा. आता नाकावरून पुरुषाचा स्वभाव कसा कळेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल म्हणून याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ नाकावरून पुरुषाचा स्वभाव कसा ओळखावा.

सरळ नाक असणारे पुरुष :- ज्या पुरुषांचे नाव एकदम सरळ असते त्या पुरुषांना ओळखणे तसेच त्या पुरुषांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेणे हे थोडे किचकट स्वरूपाचे असते. असे लोक एकदम लगेच आपल्या मनात काय चालले आहे याचा ठाव समोरच्याला लागू देत नाही. हे लोक कठीण आतल्या कठीण परिस्थितीत सुद्धा स्वतःला शांत ठेवतात. प्रेम प्रकरणाच्या बाबतीत असे पुरुष बहुतेक वेळा असफल ठरतात. परंतु प्रोफेशनल जीवनात मात्र ते नेहमीच यशस्वी ठरतात. या लोकांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे फारच अवघड असते.

चपटे नाक असलेले पुरुष :- चपटे नाक असलेले पुरुष कमी वयातच भरपूर यश संपादन करतात. कला व क्रीडा क्षेत्रात ही माणसे चांगली प्रगती करू शकतात त्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये त्यांची संख्या लक्षणीय दिसून येते. चपटे नाक असलेल्या पुरुषाचा स्वभाव हा खूप साधा सरळ व इमानदार असतो. वैयक्तिक तसेच प्रोफेशनल जीवनामध्ये हे यश संपादन करतात त्यामुळे स्वतःची व परिवाराची मान ह्यांच्यामुळे गर्वाने उंच होते. असे पुरुष कधीही दुसऱ्याचे वाईट चिंतीत नाही किंवा स्वतः देखील दुसऱ्यांचे वाईट करत नाहीत. यांना राग देखील खुप कमी येतो.

पोपटासारखे नाक असलेले पुरुष :- ज्या पुरुषांचे नाक हे थोडेफार पोपटाच्या चोची सारखे असते. ते खूप तिखट आणि जे काय आहे ते सरळ बोलणारे असतात. जोपर्यंत हाती घेतलेल्या कामात यश येत नाही तोपर्यंत हे लोक शांत बसत नाही. हे पुरुष मनाने खूप चांगले असतात. परंतु त्यांच्या स्वभावा विरुद्ध जर कोणी त्यांच्याशी वागले तर समोरच्या व्यक्तीस ते आपला शत्रू समजतात. आपण जे काय करतोय त्याचा समाजात काय प्रतिसाद उमटेल किंवा समाजात काय बोलले जाईल या गोष्टींचा या पुरुषांना फरक पडत नाही ते आपल्या मनाला जे काही योग्य वाटेल तेच करतात. जीवनात जो काही संघर्ष येईल अशा परिस्थितींना सामोरे जाऊन ते यश प्राप्त करतात आणि जीवनात पुढे यशस्वी वाटचाल करतात.

उभट नाक असलेले पुरुष :- ज्या पुरुषांचे नाक उभट असते. त्या पुरुषांमध्ये ऊर्जा व जोश मोठ्या प्रमाणामध्ये असतो. या लोकांच्या नाकावर नेहमीच राग असतो. असे पुरुष मनाने जरी साप असले तरी स्वभावाने खूप कठोर असतात. प्रेमप्रकरणात यांना जास्त धोके मिळतात. यांच्यातील सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे त्यांचा अहंकार. त्यांच्या वाटेला थोडे जरी यश आले तरी त्याचा अहंकार अशी माणसे बाळगतात.

छोटे नाक वाले पुरुष :- ज्यांचं नाव छोटा असतात असे पुरुष स्वतःच्याच विश्वात खूप खुश व आनंदी असतात. इतर व्यक्ती विषयांचा जास्त काही देणंघेणं नसतं. जोपर्यंत समोरून त्यांना कोणी त्रास देत नाही तोपर्यंत हे व्यक्ती दुसऱ्या कोणास त्रास द्यायला जात नाही. परंतु एकदा राग आला की रागात हे व्यक्ती काय करतील हे मात्र कोणी सांगू शकत नाही. यामुळेच छोटे नाक वाल्या पुरुषांबरोबर जास्त कोणाचे जमत नाही. अशा लोकांना त्यांच्या परिवारातील, मित्रमंडळी व आजूबाजूचे लोक अहंकारी समजतात.

मोठे नाक वाले पुरुष :- मोठे नाक असलेले पूर्वी दिसायला जरी एवढे खास दिसत नसले तरी समोरच्याला शब्दांच्या जाळ्यात अडकवण्यात ते माहीर असतात. असे व्यक्ती जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांच्या समोरील व्यक्ती त्यांचे म्हणणे एकदम लक्षपूर्वक ऐकत आहेत व त्यांच्या सहजपणे बोलण्यात येतात. कुठला शब्द कुठे वापरावा याची बरोबर जाण अशा व्यक्ती असते. या लोकांना जीवनात भरपूर यश व मान-सन्मान प्राप्त होतो. परंतु या लोकांमध्ये मीपणा हा खूप असतो. याच कारणामुळे समाजात यांचा थोड्याफार प्रमाणात तिरस्कार करतात.

वाकडे नाक असलेले पुरुष :- अशा प्रकारचे पुरुष फार थोड्या प्रमाणात असतात. कोणतीही बिकट परिस्थिती उद्भवली तर अशा पुरुषांना असते ते जास्त बोलले जाते. परंतु कित्येकदा या पुरुषांना समाजातून चुकीचे देखील समजले जाते. असे पुरुष परिस्थितीला सांभाळतात असे नाही परंतु हरलेली बाजी पुन्हा पलटवून ती जिंकून सुद्धा देतात. या पुरुषांमध्ये नेतृत्वाचे गुण कमी असतात. परंतु एखादा ला पाठिंबा देण्यासाठी अशा प्रकारचे पुरुष नेहमीच उत्तम असतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *