टीव्ही सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्मा अनेक वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या सिरीयलमध्ये दयाबेनची उणीव नेहमीच जाणवत असते. जिच्या रुपामध्ये आपल्याला नेहमी दिशा वकानी दिसत असते. पण दिशा वकांनीने शो सोडून आता बराच काळ लोटला आहे आणि आता मेकर्स या सिरीयलसाठी एक परफेक्ट अभिनेत्रीच्या शोधात आहेत. जी दयाबेन सारखे दशकांचे मन जिंकेल. आता हे वाटत आहे कि चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.

माहितीनुसार असा दावा केला जात आहे कि तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दयाबेनची भूमिका अभिनेत्री काजल पिसाळ करू शकते. मेकर्स काजल पिसाळच्या नावाचा विचार करत आहेत. जर काजलचे नाव फायनल झाले तर पुढच्या महिन्यामध्ये शुटींग सुरु होऊ शकते.

तथापि आतापर्यंत यावर ऑफिशियल स्टेटमेंट आलेले नाही. मेकर्सकडून या रिपोर्टवर अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्याचबरोबर काजलने देखील मौन सोडलेले नाही. गेल्या दिवसांमध्ये दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी ऐश्वर्या सखुजाचे नाव समोर आले होते. दावा केला गेला होता कि ऐश्वर्या सखुजाने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण ती सिलेक्ट झाली नाही.

यबद्दल स्वतः ऐश्वर्याने माहिती शेयर केली होती. तिने म्हंटले होते कि मी या भूमिकेसाठी टेस्ट दिली होती, पण मला वाटत नाही कि मी हे करू शकेन. काजल टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सिरीयलमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. ज्यामध्ये बड़े अच्छे लगते हैं, एक हजारों में मेरी बहना है, नागिन ५, उड़ान आणि एक मुट्ठी आसमान सारख्या अनेक सिरियल्स आहेत.