बदलत्या काळानुसार लग्न आणि रिलेशनशिप बद्दल लोकांचे विचार देखील बदलत आहेत. आधुनिक जगामध्ये अनेक मुली एकट्या राहून आयुष्य घालवणे जास्त पसंद करत आहेत. असाच विचार टीव्ही शो दीया और बाती हम फेम अभिनेत्रीने केला आहे. होय टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःसोबतच लग्न केले आहे. ऐकून धक्का बसला ना ?

कनिष्का सोनीने नुकतेच आपले काही खास फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती कुंकू लावलेली आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेली दिसत आहे. कनिष्का सोनीचे हे फोटो पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. कनिष्काने आपले फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये असे काही लिहिले आहे कि लोकांचे होशच उडाले आहेत. अभिनेत्रीने सांगितले कि तिने स्वतःसोबत लग्न केले आहे.

अभिनेत्रीने मंगळसूत्र घालून फोटो शेयर करताना लिहिले आहे कि मी स्वतःसोबत लग्न केले आहे. मी माझी सर्व स्वप्ने स्वतःच पूर्ण केली आहेत आणि ज्या एका व्यक्तीसोबत प्रेमात आहे ती मी स्वतःच आहे. मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी एकटीच आनंदी आहे. मी मजबूत आणि शक्तिशाली आहे. शिव आणि शक्ती माझ्यामध्ये आहेत धन्यवाद.

कुंकू लावून आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेल्या अभिनेत्री कनिष्का सोनीचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी फक्त तिचीच चर्चा होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोवर प्रतिक्रिया देत तिच्या निर्णयाला धाडसी म्हणत आहेत. खरच म्हणावे लागेल कि कनिष्का सोनीने खूपच धाडसी पाऊल उचलले आहे.

अॅडवेंचरवर प्रेम करणारी अभिनेत्री कनिष्का सोनी म्हणाली कि, मला अॅडवेंचर खूप पसंद आहे. मला माझ्या आवडत्या गोष्टी करून माझे दिवस संस्मरणीय बनवायचे आहेत. जे मला पसंद आहे, मी पार्टी पर्सन नाही. मी बहूते पार्टी अवॉइड करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanishka Soni (@itskanishkasoni)

कनिष्का सोनी दीया और बाती हम, पवित्र रिश्ता आणि देवी आदि पराशक्ति सारख्या सुपरहिट सिरियल्सची भाग राहिली आहे. दीया और बाती हम आणि पवित्र रिश्ता या दोन्ही सिरियल्सनी टीव्हीवर धुमाकूळ घातला होता. दर्शकांना या सिरियल्सचे वेड लागले होते. तर कनिष्काबद्दल बोलायचे झाले तर तिने आता हॉलीवुड मध्ये एंट्री करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे.