कापुराचे उपयोग पूजा पाठात केला जातो हे सर्वांना माहीत आहे. पण आज आम्ही तुम्हाला कापुराचे असेही काही उपयोग सांगणार आहोत जे तुम्हाला माहित नसतील. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण कपूरचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठी पण करतात. सरळ सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पूजापाठात कापूर वापरल्यामुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते तर चेहऱ्यासाठी कापूर चा उपयोग केल्यास सौंदर्यात भर पडते.

आपला चेहरा सुंदर बनवण्यासाठी आपण कितीतरी गोष्टी बाजारातून विकत घेतो. त्यामुळे काही वेळेस आपला फायदा कमी तर नुकसान जास्त होते. म्हणून आम्ही आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या मुळे तुमचा चेहरा नैसर्गिक रित्या सुंदर बनू शकतो कापुराच्या उपयोगाने तुमच्या चेहऱ्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

१) पिंपल्स कमी करण्यासाठी :- जर तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स असतील आणि त्यापासून तुम्ही सुटका मिळू इच्छिता तर तुम्हाला जास्त काही नाही फक्त खोबरेल तेलात कापूर व्यवस्थित मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातील आणि चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग सुद्धा पडणार नाहीत.

२) त्वचा तजेलदार करण्यासाठी :- जर तुम्हाला त्वचा तजेलदार करायचे असेल तर कापुराचे उपयोग नक्कीच करा. यासाठी रात्री झोपायच्या आधी दुधात थोडी कापुराची पावडर मिक्स करा आणि त्यात चांगले मिश्रण तयार करा. त्यानंतर हे मिश्रण कापसाने चेहऱ्याला लावा आणि पाच मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाका. हे रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

३) कापूराचे तेल :- जर तुम्ही चेहऱ्यावरील मुरूमांनी त्रस्त असाल तर दररोज झोपायला जायच्या आधी चेहरा धुवा आणि चेहऱ्याला कापुराचे तेल लावा. आणि आरामात झोपून जा. सकाळी उठल्यावर तोंड स्वच्छ धुवा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम नाहीशी झालेले दिसतील.

४) पायाला पडलेल्या भेगा घालवण्यासाठी :- पायाला पडलेल्या भेगा घालवण्यासाठी गरम पाण्यात थोडासा कापूर आणि मीठ घाला. थोडावेळ पाय पाण्यात ठेवून बसा. त्यानंतर तुमच्या पायाला स्क्रब लावा आणि त्यावर क्रीम लावा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

५) बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी :- घरात कापुराचा धूर केल्यास घरातील सर्व प्रकारचे बॅक्टेरिया नष्ट होतात. त्याचबरोबर अनेक प्रकारचे इन्फेक्शन आणि आजार यापासून दूर राहता येते.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.