सध्या लग्नांचा सीजन चालू आहे. तुम्हाला सुद्धा आपल्या जवळच्या लोकांकडून डजनभर पत्रिका आल्या असतील आणि कदाचित तुमचा वेळही ह्या लग्नांना हजेरी लावण्यात जात असेल. तसे नसेल तर कदाचित तुम्ही स्वतःच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त असाल. पत्रिकेचं डिजाईन ठरवणे, वधू वरा साठी कपडे सिलेक्ट करणे, हॉल बुक करण्या पासून ते दाग दागिन्यांच्या खरेदी पर्यंत ची सर्व कामं पाहणं हा लहान मुलांचा खेळ नक्कीच नसतो. लग्न धुमधडाक्यात पण व्यवस्थित पार पाडण्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुम्ही करतच असता.

तसेच बरेच जण अगदी सर्वच जण लग्न जमवण्यासाठी वधू वराची पत्रिका जुळते आहे कि नाही ते सुद्धा पाहतात. असे केल्याने दोघांच्या लग्ना नंतरच्या आयुष्याचा अंदाज घेता येतो असे म्हणतात. आणि मगच दोघांच्या लग्नाला अधिकृत मान्यता मिळते आणि तारीख नक्की केली जाते. पण ह्या सर्वांमध्ये तुम्ही विवाहा नंतर सुखी संसार करण्यासाठी आवश्यक असलेल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असता. ती म्हणजे वधू वराची आरोग्य चाचणी.जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आयुष्याबद्दल माहिती असणं फार गरजेचे आहे. जशी लग्नाची तारीख जवळ येत आहे त्या अगोदरच तुमचे आणि तुमच्या जोडीदाराच्या ४ टेस्ट जरून करून घ्या जेणेकरून तुम्ही लग्नानंतर येण्याऱ्या आव्हानांसाठी अगोदरच तयार व्हाल.

१) वंध्यत्व चाचणी (infertility test) – वंध्यत्व चाचणी म्हणजे infertility टेस्ट ही महिलेच्या अंडाशयाचे आरोग्य आणि पुरुषाचे शुक्राणू म्हणजे स्पर्म काउंट तपासण्यासाठी केली जाते. ही टेस्ट केल्याने तुम्हाला पुढे मुल होण्याच्या शक्यतेबाबत अंदाज बांधता येतो. ह्याची कोणतेही लक्षणं नसल्यामुळे तुम्हाला ह्याची मेडिकल टेस्ट करून घ्यावी लागेल. ही टेस्ट केल्याने तुम्ही तुमच्या पुढच्या ट्रीटमेंट ला योग्य ती दिशा देऊ शकता.२) रक्त गट कम्पॅटिबिलिटी चाचणी – रक्त गट अनुकूलता चाचणी म्हणजेच तुमचा रक्तगट तुमच्या जोडीदाराशी अनुकूल आहे कि नाही ते पाहणे. हे कदाचित तुम्हाला महत्वाचे वाटणार नाही पण तुम्हाला मूल अपेक्षित असेल तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या रक्तात सारखा Rh फॅक्टर असला पाहिजे. जर तुमचा रक्तगट एकमेकांशी सुसंगत नसेल तर गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. Rh फॅक्टर मिळता जुळता नसल्यास तो तुमच्या दुसऱ्या होणाऱ्या मुलासाठी धोकादायक ठरू शकतो कारण गर्भधारण केलेल्या महिलेच्या रक्तातले अँटीबॉडीज बाळाच्या रक्त पेशी नष्ट करू शकतात.

३) अनुवांशिक घटक चाचण्या – अनुवांशिक घटक चाचण्या म्हणजे Genetic conditions एका पिढी कडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. त्यामुळे उशीर होण्या आधीच ह्या पिढीजात आजारांच्या चाचण्या करून घेणे खूप आवश्यक आहे. अश्या आजारांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर, किडनी शी संबंधित आजार तसेच डायबिटीज अशा आजारांचा समावेश होतो. ह्या आजारांचे वेळीच निदान झाल्यास जीवावर बेतण्या अगोदरच त्यांच्या उपचारांना योग्य ती दिशा देऊन संबंधित आजारावर नियंत्रण मिळवता येते.४) STD (sexually transmitted diseases) टेस्ट – आजकाल लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं खूप सामान्य झाले आहे त्यामुळे दोघांनी लग्नाआधी STD टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. ह्यामध्ये HIV/AIDS, Gonorrhoea, Herps, Syphilis and Hepatitis C इत्यादी आजारांचा समावेश होतो. ह्यापैकी काही रोग हे अत्यंत धोकादायक असल्याने STD टेस्ट करून घेतलीच पाहिजे. जर तुंमच्या जोडीदाराचे निकाल सकारात्मक आल्यास तुम्ही होणाऱ्या मनस्तापा पासून वाचू शकता आणि त्या जोडीदाराला लग्नासाठी नकार देऊ शकता. ह्या चारही चाचण्या तुमच्या साठी येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी खूपच आवश्यक असून सुखी संसारासाठी ह्या चाचण्या अवश्य करून घ्या. माहिती आवडली असल्यास लाईक करून नक्की शेयर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.