सर्व महिला आपल्या सौंदर्याबद्दल नेहमी सचेत राहत असतात. खास करून आपल्या चेहऱ्याबद्दल. जवळ जवळ सर्व महिलांना हे टेंशन असते कि त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या, फाईन लाईन्स येऊ नयेत. असे काही होऊ नये म्हणून महिला महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरतात. पण तरीही त्याचा काही फायदा होत नाही जितकी अपेक्षा केली जाते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही पानांबद्दल सांगणार आहोत जे आपल्या घराच्या आसपास आढळतात. या पानांचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा तजेलदारपणा आणू शकता.

पेरू आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. याची पाने स्कीनसाठी खूप फायदेशीर असतात. पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे सुरकुत्या रोखण्यास मदत करतात. याचा फेस पॅक त्वचेला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे काम करतो. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. हे पोषक तत्व चेहऱ्यावर तजेलदारपणा आणून चेहरा पुन्हा चमकदार बनवतात.फेस मास्क कसा बनवावा :- पेरूची पाने २-३ टेबलस्पून पाण्यामध्ये घालून मिक्स करा. त्यानंतर यामध्ये दही मिसळून एक घट्ट पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी आणि २० मिनिट सुखु द्यावी. जेव्हा हि पेस्ट पूर्णपणे सुखेल तेव्हा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

डाळिंबाची पाने :- डाळिंबाची पाने पचनासाठी तर मदत करतातच पण त्याचबरोबर एक्जिमासारख्या स्कीनच्या समस्येचा इलाज देखील या पानांमध्ये लपला आहे. हि पाने स्कीनला पुनर्जीवित करून वय वाढण्याच्या संकेतांना कमी करतात. या पानांमध्ये पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे स्कीनला पोषण मिळते.बॉडी ऑईल कसे बनवावे :- काही डाळिंबाची पाने घेऊन २५० मिली तिळाच्या तेलामध्ये उकळून घ्या. याला कमीत कमी १५-२० मिनिटांमध्ये चांगले उकळावे. जेव्हा हे थंड होईल तेव्हा तेल चांगले गाळून घ्या आणि एका बाटलीमध्ये भरून ठेवा. दिवसातून दोन वेळा या तेलाचा प्रयोग करून त्वचेवर चांगली मालिश करावी. आपल्या चेहऱ्यावर १० मिनिटे हे तेल लावून ठेवावे आणि त्यानंतर ओलसर टॉवेलने पुसून टाकावे.