झोपताना लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे होणारे नुकसान समूजन घ्या !

4 Min Read

सुदृढ स्वास्थ्यासाठी शरीराला पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक असते. हे वाक्य तुम्ही अनेक ठिकाणी वाचले असेल किंवा ऐकले असेल. त्याचप्रमाणे अनेक आजारांचे मूळ कारण हे पुरेशी झोप न मिळणे हे असते असे सांगितले जाते. परंतु चांगली झोप मिळण्यासाठी सुद्धा काही गोष्टी आवश्यक असतात. जसे की स्वच्छ बेड, योग्य उशा, शांत वातावरण आणि थोडेसे दमलेले शरीर. या सर्व गोष्टी माणसाला मिळाल्या कि त्याला उत्तम प्रकारचे झोप लागते. जी आरोग्यासाठी योग्य ठरते. काही लोक झोपते वेळी खोलीमध्ये पूर्णपणे अंधार करून झोपतात तर काहीजण मंद प्रकाशात झोपतात. तुम्हाला माहित आहे का या गोष्टींचा देखील तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो ते ! चला तर मग जाणून घेऊन मंद प्रकाशात झोपणे फायदेशीर ठरते हे नुकसानदायक.

एका संशोधनात असे दिसून आले की लाईट बंद करून झोपणे हे शरीरासाठी स्वास्थासाठी योग्य असते. जर तुमची झोप योग्य प्रकारे पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर व मानसिक स्थितीवर होऊ शकतो. जेव्हा आपले शरीर थकलेले असते त्याच वेळी मनाची एकाग्रता देखील कमी होऊ लागते. ज्यामुळे भविष्यात व्यक्तीला खूप सार्‍या समस्यांना सामोरे जावे लागते. लाईट चालू ठेवून झोपण्याचे जरी खूप नुकसान असले तरी त्याचे काही फायदे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखातून लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे होणाऱ्या नुकसाना बद्दल माहिती सांगणार आहोत.लाईट चालू ठेवून झोपण्यामुळे होणारे नुकसान
झोप पूर्ण न होणे :- रात्री लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे लोकांची झोप नीट पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसरा दिवस हा पूर्णपणे थकवा देणारा ठरतो. याव्यतिरिक्त दिवसभर कामात मन लागत नाही, डोळ्यांवर सारखी झोप येते. त्यामुळे माणूस चिडचिडा होतो. या सगळ्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर तसेच घरातील किंवा ऑफिसमध्ये कामावरती देखील होतो. जर असे खूप दिवस झाले तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे जर तुम्हाला लाईट मध्ये झोपण्याची सवय असेल तर ते वेळीच बदला.
डिप्रेशन :- एखादी गोष्ट एके ठिकाणी ठेवल्यावर ती कुठे ठेवली आहे हे तुम्ही सारखे विसरलात, तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, नीट पूर्ण होत नसेल, स्वभाव चिडचिडा झाला असेल तर या सर्व समस्या लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे होतात. रात्री झोपताना चेहऱ्यावर पडणारा प्रकाश हा मेंदूतील ग्रंथींना शांत होण्यास बाधा आणतो.वजन वाढणे :- एका संशोधनात असे दिसून आले की लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे वजन वाढते. हे संशोधन महिलांवर केले गेले होते. त्यात असे दिसून आले की ज्या महिला टिव्ही किंवा लाईट चालू ठेवून झोपतात त्यांचे वजन अन्य महिलांच्या तुलनेत जास्त असते. याचे मुख्य कारण रात्री लाईट चालू ठेवून झोपणे आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जास्त जेवणे हे देखील आहे.
वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते :-
तुम्ही लाईट चालू करून झोपला तर तुमच्या मेंदूतील ग्रंथींना त्रास होऊ लागतो त्या धीम्या गतीने काम करू लागतात. त्यामुळे एखादी गोष्ट आठवणे किंवा करणे यांसारख्या दैनंदिन क्रियांमध्ये तुमची गती कमी होत जाते.
जुन्या आणि गंभीर आजारांच्या वाढत्या समस्या :- तुम्ही लाईट चालू ठेवून झोपत असाल तर तुमचा जुना बरा झालेला आजार पुन्हा नव्याने होण्याची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब, हार्टअटॅक, डायबिटीज यांसारख्या आजारांचा यात प्रामुख्याने समावेश होतो.त्यामुळे झोपताना नीट लाईट बंद करून झोपावे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *