स्त्रिया स्वतःला सुंदर बनवण्यासाठी व तरुण ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय आजमावून बघत असतात. मग त्या ब्युटी पार्लर मधे जातात किंवा कोणतीतरी ब्युटी क्रीम वापरतात किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने उपाय करतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की जेव्हा राजा महाराजांचे राज्य चालत असे त्यावेळी राण्या स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कोणते उपाय करत असतील? कारण त्यावेळी तर कोणत्याच प्रकारचे ब्युटी पार्लर किंवा ब्युटी क्रीम उपलब्ध नव्हत्या. इतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. अशा कोणत्या गोष्टी राण्यांकडे होत्या ज्यामुळे त्या एवढ्या सुंदर दिसायच्या.

त्यावेळेच्या इतका सुंदर असायचा की सहज त्यांच्या कोणीही प्रेमात पडेल. त्यावेळी राण्या सुंदर दिसण्यासाठी फक्त प्राकृतिक गोष्टींचा वापर करीत असे. असे म्हटले जाते की त्यावेळी राण्या आंघोळ करते वेळी पाण्यामध्ये दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून स्नान करीत असत त्यामुळे त्यांची त्वचा कोमल व नितळ असायची. याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यात काही वेळेस मध आणि ऑलिव ऑइल टाकत जेणेकरून त्यांची त्वचा तरुण राहायची. त्यावेळी राण्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तलवार बाजी आणि व्यायाम करायचा. याच प्रमाणे चेहरा चमकदार बनवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग तोंडाला फेसपॅक प्रमाणे लावत. असेच मदिरा म्हणजेच बिअर, अंड्याचा पांढरा भाग व लिंबू यांचादेखील फेसपॅक वापर करीत असत. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा रुक्ष बनत नसे आणि ती सुंदर दिसत असे. आंघोळ करते पाण्यामध्ये चंदन पावडर, गुलाब जल, केशराचे दूध यांचेदेखील मिश्रण असे. केस चमकदार बनवण्यासाठी राणी मध व ऑलिव ऑइलचा वापर करत असे. त्यावेळी राण्या अक्रोडाचे सेवन मोठ्या प्रमाणावर करत. यामुळे त्यांना वृद्धत्वापासून लांब राहता येत असे. डोळे पाणीदार बनवण्यासाठी त्या जेवणात गाजरांचा समावेश मोठ्या प्रमाणावर करीत असत.