तुमचे आवडीचे कलाकार बालपणी कसे दिसत होते पहा, रसिका सुनीलला तर पाहून दंग व्हाल !

4 Min Read

मित्रांनो मराठीतले अनेक कलाकार तुम्हाला माहिती असतील. फोटो पाहून त्यांचं नाव ही तुम्ही सांगू शकाल. आज आम्ही तुम्हाला त्यांचे लहानपणीचे फोटो दाखवणार आहोत. काही कलाकारांना विश्वास पण बसणार नाही त्यांचा लहानपणीचा फोटो बघू त्यांच्यात एवढा बदल झाला आहे हे पाहून. हे फोटो पाहून तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणीचा फोटो आठवेल आणि बालपणीतल्या अनेक आठवनींना उजाळा मिळेल. चला तर मग पाहूयात तुमच्या आवडीच्या कलाकारांचे बालपणीचे फोटो.

१) तेजश्री प्रधान :- ही पिंक लेहेंगा घातलेली छोटी चिमुरडी आहे तेजश्री प्रधान. आता तुम्ही सुद्धा म्हणाल, काहीही हा श्री! तिचा होणार सून मी ह्या घरची मधला तिचा हा लोकप्रिय डायलॉग तुम्ही तिच्यावर हक्काने मारू शकता कारण तिच्या मध्ये झालेला बदल हा न ओळखता येण्यासारखाच आहे. तिला तुम्ही सूर नवा ध्यास नवा ह्या शो मधेही सूत्रसंचालक म्हणून पाहू शकता.२) मृण्मयी देशपांडे :- मृण्मयी लोकप्रिय झाली तिच्या झी मराठीवरच्या कुंकू ह्या सिरीयल मुळे. सर्वांची आवडती मृण्मयी लहानपणी सुद्धा तितकीच गोड होती हे तुम्ही फोटोमध्येच पाहू शकता. मृण्मयी चे डाय हार्ड फॅन्स तिला हा फोटो पाहून अगदी आरामात ओळखतील. मृण्मयी चा जन्म सोलापुरात झाला आणि पुण्यात वाढली. असं म्हणतात वयानुसार आपल्या चेहेर्यात बदल होत जातात पण मृण्मयी ला बघून ती आज ही आधी होती तशीच दिसते.
३) पूजा ठोंबरे :- झी मराठी वरची दिल दोस्ती दुनियादारी तुम्हाला आठवतच असेल. ह्या सिरीयल मधली ऍना आठवतेय? हा शो खूप लोकप्रिय झाला होता, सगळ्यांमध्ये सर्वात लहान सदस्य असलेली ऍना म्हणजेच पूजा ठोंबरे चा लहानपणीचा हा फोटो आहे.४) सखी गोखले :- दिल दोस्ती दुनियादारी ह्या सिरीयल मधला अजून एक घरातला सदस्य म्हणजे रेश्मा इनामदार. घरातल्या इतर सदस्यांपेक्षा रेश्माची स्टोरी थोडी दुःखी करणारी होती. तिचं राहतं घर सोडून आलेली रेश्मा घरातील सर्वच सदस्यांची फेव्हरेट होती. ह्या फोटोमध्ये तुम्ही तिचा लहानपणीचा फोटो पाहू शकता. तिने ह्याच सिरीयल मधल्या सुजयशी म्हणजेच सुव्रत जोशीशी लग्नगाठ बांधली आहे.५) श्रुती मराठे :- श्रुती मराठेचा फोटो बघून तुम्हाला शंभर टक्के विश्वास बसणार नाही. जागो मोहन प्यारे मधून लोकप्रिय झालेली श्रुती ह्या फोटो मध्ये सुद्धा खूप गोड़ दिसते आहे. पण तरीही ही श्रुतीच आहे कि नाही ही शंका येतेच. मूळची गुजरातची असलेली श्रुती सनई चौघडे ह्या मराठी चित्रपटापासून आपल्या करियर ची सुरवात केली. हल्लीच ती नेटफ्लिक्स वरच्या बार्ड ऑफ ब्लड ह्या वेब सिरीज मधेही दिसली होती.
६) अक्षया देवधर :- झी मराठी वरच्या तुझ्यात जीव रंगला मधल्या पाठक बाई तुम्हाला माहितीच असतील. ह्याच त्या पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर लहान असताना काळ्या फ्रॉक मध्ये आजही तश्याच दिसतात. अगदी राणा दा सुद्धा ह्यांना ओळखायला वेळ लावणार नाही.७) रसिका सुनील :- रसिका सुनील म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको मधली शनाया खूप लोकप्रिय झाली होती. तिचा बोल्ड लुक पण विनोदी शैली प्रेक्षकांना खूप आवडली होती. दिसायला बोल्ड असलेली शनाया लहानपणी सुद्धा तितकीच गोड दिसायची हे हा फोटो बघुनचच तुम्हाला कळलं असेल.८) स्पृहा जोशी :- अभिनेत्री स्पृहा जोशीने लहानपणी बाळ कलाकार म्हणून दे धमाल ह्या सिरीयल मधेही काम केलं आहे. त्यानंतर तिने उंच माझा झोका आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या चित्रपटामधून लोकप्रिय झाली. स्पृहा चा लहानपणीचा हा फोटो पाहिल्यास तुम्हालाही विश्वास नाही बसणार. चष्मा घातलेली ही लहान मुलगी आणि आजच्या स्पृहा मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.तुम्हाला सर्वात जास्त कोणाचा लहानपणीचा फोटो आवडला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि शेयर करायला विसरू नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *