आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच बाबतीत दातांच्या तक्रारी ऐकू येतात. कोणी दात दुखी पासून त्रस्त असते तर कोणी दातात असलेल्या किड्यामुळे खूप वैतागलेले असतात.सुरुवातीला या दात दुखी कडे कोणी एवढ फारसं नीट लक्ष देत नाही पण नंतर हळूहळू ही समस्या वाढत गेली की ती खूपच त्रासदायक होऊ लागते. ज्यामुळे सगळे दात किडू शकतात आणि ते खराब होतात.

दातांमुळे सापडला वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद लुटू शकतो ते चावून खाऊ शकतो त्याची चव चाखू शकतो. त्यांचा उपयोग फक्त खाण्यापुरताच नव्हे तर तो हसताना आपण सुंदर दिसावे यासाठी सुद्धा होतो. त्यामुळे दातांची नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्या तुम्ही केल्यास दातांच्या समस्या काही दिवसातच दूर होतील.

दातामधील किड्याला घालवण्यासाठी हा घरगुती उपाय करून पहा.
कांदा :- कांदा हा एक नैसर्गिक औषध म्हणून वापरला जातो. दातातील कीड घालवण्यासाठी कांद्याचा उपयोग लाभदायक ठरतो. त्यामुळे दात असलेले किडे निघून जातात.

हिंग :- हिंगाची पावडर पाण्यात घालून उकळवावी आणि नंतर ती गार झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. जर तुमचे दात पोकळ झाले असतील तर किंवा दातांमध्ये छिद्र असतील तर त्यात हिंग भरावा. यामुळे क्षेत्रात असलेले किडे मरतात आणि ते दाताबाहेर निघून जाण्यास मदत होते.

मोहरीचे तेल :- दातांमध्ये किडे असतील तर तुम्ही मीठ, हळद, आणि मोहरीचे तेल यांचे मिश्रण करून दातांवर चोळा. यामुळे दातातील किडे बाहेर पडतात आणि त्यात किडण्या पासून रोखले जाते.

लसुण :- लसुणाचे भरपूर सारे गुणधर्म आहेत. लसूणही अँटी बॅक्टेरियल, अँटि फंगल, आणि अँटिबायोटिक यांसारख्या गुणधर्मांनी युक्त असते. लसणाच्या एका पाकळीला सैंधव मिठात घोळवा. आणि त्या पाकळीला जो दात किडला आहे त्या दाताखाली ठेवून द्या. दोन मिनीटे ती पाकळी दाताखाली तशीच राहू द्या. असे रोज दिवसातून खूपदा केल्याने तुम्हाला लवकरच दातातील कीड पासून मुक्तता मिळेल.

जायफळाचे तेल :- किडलेल्या दातांसाठी जायफळाचे तेल हे उत्तम औषध आहे. यासाठी एक छोटासा कापसाचा गोळा जायफळाच्या तेलामध्ये बुडवा आणि तो दुखत असलेला दाताखाली लावा. पाच मिनिटे तो कापूस तसाच ठेवावा त्यानंतर तो कापूस काढून टाकून गरम पाण्याने गुळण्या करा.यामुळे दातातील कीड निघून जाऊन दात दुखी पासून तुमची सुटका होते तसेच तुमचे दात स्वच्छ होतात.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.