नियमित गुळाचे सेवन केल्याने होणारे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

3 Min Read

भारतात अगदी पूर्वीच्या काळापासून आपण गुळाचा वापर करत होतो. मात्र आलिकडील काही वर्षांमध्ये गुळापेक्षा साखर वापरण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे त्यामुळे अनेक रोग आपल्या जीवनात प्रवेश करुन आपले जीवन रोगग्रस्त करत आहे. तर आज ही तुम्हाला गुळाचे फायदे सांगणार आहोत.

१) पिंपल्सची समस्या – आपल्या आहारात तेलाचा आणि मसाल्यांचा अतिरेकी वापर होत असतो. तसेच प्रदूषण यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या खुप वाढली आहे. जर आपण रोज थोडा थोडा गुळ खाल्यास पिंपल्स कमी होतात.
२) एनिमिया – गुळामध्ये लोहाचा समावेश असतो. त्यामुळे गुळासोबत पाण्याचे सेवन केल्यास एनिमियाचा त्रास कमी होऊ शकतो.
३) थकवा – आजचे जीवन हे धावपळीचे जीवन बनले आहे. तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल तर गुळ खाणे फायदेशीर ठरु शकते.४) गॅस आणि अपचन – अनेकांना गॅस व अपचन सारख्या समस्यांशी सामना करावा लागतो. गुळाचा सेवन केल्याने विशेषतः जेवल्यानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने पचन चांगले होते व गॅसची समस्या दूर होते.
५) दमा –
दम्याचा त्रास होत असल्यास गुळ खावा. गुळामध्ये अँटी एनार्जिक तत्व असतात जे दम्याचा आराम देतात व शरीरातील तापमान योग्य ठेवण्यास मदत होते. दमा कमी होऊ शकतो.
६) श्वसनासंबंधी त्रास – श्वसनासंबधीच्या त्रासावर देखील गुळ उपयोगी ठरतो. ५ ग्रॅम गुळा मध्ये तितकेच म्हणजेच ५ मिली लिटर सरसोच्या तेलामध्ये मिसळून तो खावा. त्याने श्वासांना संबंधी तक्रारी दूर होऊ शकतात.७) घसा बसणे – घसा बसल्यावर देखील गुळाने आराम मिळतो. शिजलेल्या भाताबरोबर गुळाचे सेवन करा. तुमचा घसा नक्की बरा होईल.
८) कान दुखी –
कान दुखीचा त्रास होत असल्यास तुपामध्ये गुळ मिसळून खावा. तसा खाल्यास कानदुखीपासून आराम मिळू शकतो.
९) सांधेदुखी – सांधेदुखीचा त्रास हल्ली सर्वानाच होतो. आणि त्यावर गुळ हे अतिशय औषधी आहे. एक लास दुधासोबत गुळ खाल्यास आपली हाडे बळकट होतात. तसेय आल्या सोबत म्हणजेच अदरक सोबत गुळाचे सेवन केल्यास सांधेदुखीपासून मुक्तता होते.१०) सर्दी आणि खोकला – हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात. अशांना गुळ फायदेशीर ठरू शकते. तसेच गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. आणि त्यामुळे सर्दी व खोकला लवकर बरा होतो.
११) लठ्ठपणा –
आजच्या धकाधकीच्या जीवनात लठ्ठपणा ही सवीत मोठी समस्या बनली आहे. जर तुम्ही या समस्येने सस्त असाल तर गुळाची चहा पिणे फायदेशीर ठरू शकते.
१२) मासिक पाळी – मासिक पाळी वेळी तीळगुळ खावेत. तिळगुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी वेळी पोटदुखीची समस्या असते ती कमी होते. ज्यांना नियमित पाळी येत नसेल अशानी गुळाचे सेवन केल्यास पाळी नियमित येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *