९९% लोकांना नाही माहित पायाचं दुसरं बोट हे अंगठ्यापेक्षा लांब असण्यामागचे काय आहे वास्तविक कारण !

2 Min Read

प्रत्येकाचा शरीराची, अवयवांची जडणघडण ही वेगळी असते. कोणी उंच असतं, कुणी लठ्ठ असतं, कुणाच्या हाताला वा पायाला सहा बोट असतात, कुणी सावळा असतो तर कुणी गोरा असतो. या गोष्टींशिवाय मानवी शरीराचे काही भाग हे इतरांचा तुलनेत मोठे-छोटे असतात. आपल्या पायाचे दुसरे बोट हे असेच असते. सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीराची रचना ही आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, भविष्याबद्दल सांगते. त्याचप्रमाणे आपल्या पायाच दुसरं बोट ही अशीच माहिती सांगत असतं.

तुमच्या पायाचं दुसरं बोट हे अंगठ्यापेक्षा लांब असेल तर तुम्ही उत्साही व भावूक आहात असे त्याचा अर्थ होतो आणि अशी माणसं नेहमी आनंदी ही राहतात वा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. असे लोक फार चंचल स्वभावाचे असतात. त्याचबरोबर ते फार हुशार असतात आणि आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर जीवनात फार यशस्वी होतात. एका नेमक्या पठडीतील काम करण्याला ते जास्त प्राधान्य देतात. जर कुणाच्या पायाची बोटे अंगठ्यापासून उतरत्या क्रमाने असतील तर असे लोक दुसऱ्यांवर अधिकार गाजवणारे असतात. यांचे मत असते की, दुसऱ्यांनी त्यांचे म्हणणे प्रथम ऐकावे. पती-पत्नी दोघांचीही बोटे उतरत्या क्रमात असतील तर त्यांच्यात नेहमी वाद होतात.ज्या लोकांच्या पायाचं दुसरं बोट आणि अंगठा एका समान रेषेत असतात, ते अगदी कष्टाळू, मेहनती, कामाप्रती प्रेम असणारे अशी ओळख समाजात निर्माण करतात. अशी लोक जीवनातील प्रत्येक समस्येवर तोडगा काढत आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून काम पूर्ण करतात. सकारात्मक विचारसरणी असलेली ही लोक असतात. आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूचा परिसर ही सकारात्मक करतात.कोणाच्या पायाचा अंगठा लांब असेल व बाकी बोटे छोटी किंवा एकसारखी असतील तर अशा व्यक्ती खूप शांत व सावकाशपणे काम करणाऱ्या असतात. या व्यक्ती आरामात कोणतीही समस्या सोडवतात. आपल्या विरोधकांचा उत्तम सामना करून स्वतःचे काम चोख करतात. अंगठा व बाजूची दोन बोटे सारख्या उंचीची असलेले लोक फार मेहनती, नम्र व जबाबदार असतात. ही माणसे विनाकारण वादात अडकत नाहीत. कोणालाही त्रास देण्याचा यांचा स्वभाव नसतो. अशी व्यक्ती आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात मिळणे मोठी भाग्याची गोष्ट असते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *