पायात घालण्यात येण्याऱ्या पैंजणाला भारतात १६ शृंगारांपैकी एक मानले जाते. जर तुम्ही पण त्या मॉडर्न मुलींपैकी एक असाल ज्या पैंजण घालणे ओल्ड फॅशन वाटते तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. पैंजण घालणं महिलांसाठी केवळ एक दागिना नाही आहे तर ह्या मागे अनेक आरोग्याशी संबंधित फायदे आहेत. चला वाचूया कोणते आहेत हे फायदे.

१) सुंदर आणि आकर्षक दिसा :- पैंजण घातल्याने आपला लुक ऍक्टिव्ह तर दिसतोच पण पायांचे सौंदर्य ही वाढते. ह्या व्यतिरिक्त पैंजणाच्या आवाजाने पुरुष आपल्याकडे आकर्षित होतात. जर तुम्हालाही आपल्या पार्टनर ला आपल्याकडे आकर्षित करायचे असल्यास आजपासूनच पैंजण घालायला सुरवात करा.

२) मजबूत हाडांसाठी :- सोने किंवा चांदीचे पैंजण घातल्यास हाडे मजबूत होतात. पैंजणाच्या धातूतील तत्व त्वचे च्या मार्गाने शरीरात जाऊन हाडांना मजबूत करतात. महिलांचे जस जसे वय वाढते तसे त्यांच्यातले कॅल्शिअम कमी होण्यास सुरुवात होते. कॅल्शिअम ची कमतरता अनेक दुखापतींना कारणीभूत ठरते. त्यामुळे ज्यांच्या मध्ये अगोदरच कॅल्शिअम कमी आहे त्यांनी पैंजण घालाच.

३) पाय सुजतो? :- ज्या महिलांना पाय सुजण्याची समस्या आहे त्यांनी चांदीच्या पैंजण घातल्यास बराच लाभ मिळतो. हो, ह्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते आणि नैसर्गिक रित्या पायांचे सुजणे थांबते. शरीरात रक्ताभिसरण चांगले असेल तर त्वचा सुंदर होते, चेहेऱ्यावर तेज येते आणि हृदयरोगांपासूनही संरक्षण होते.

४) विदुयत ऊर्जा टिकवून ठेवा :- पैंजण पायातून निघणारी शारीरिक विदुयत ऊर्जा शरीरातच सुरक्षित साठवून ठेवते. हो, विदयुत ऊर्जा शरीरात सुद्धा असते. आपल्या शरीरातल्या पेशी विदयुत ऊर्जा वाहून नेण्यास सक्षम असतात. शरीरात विदुयत ऊर्जा ही नर्वस सिस्टिम ला मेंदू पर्यंत सिंग्नल पोचवण्यासाठी आवश्यक असते. ज्यामुळे आपण हालचाल, विचार आणि फील करू शकतो. आपल्या शरीरातील पोटॅशिअम, कॅल्शिअम, आणि मॅग्नेशिअम मध्ये काही विशिष्ट विदयुत ऊर्जा असते ज्याला ईऑन्स (ions) असेही म्हणतात. जवळपास सर्वच पेशी ह्यांचा उपयोग विदुयत ऊर्जा तयार करण्यासाठी करतात.

५) चरबी ला ठेवा नियंत्रणात :- पैंजण पोटावर आणि त्या खालच्या भागावर चरबी वाढण्याचा वेग कमी करते. शरीरात अतिरिक्त चरबी वाढणं स्थूलपणाचं लक्षण असतं. चरबी वाढल्याने आपण स्लो होतो. झोप जास्त लागते आणि माणूस आळशी बनतो. परिणाम, तरुण वयातच तुम्ही काकू दिसायला लागता. बाहेरचे खाल्ल्यामुळे तर चरबी अजूनच वाढत जाते. पैंजण घातल्यास चरबी वाढण्याचा वेग कमी होतो.

६) नकारात्मक उर्जेस ठेवा दूर :- वास्तू च्या अनुसार पैंजणामुळे होणारा आवाज नेगेटिव्ह ऊर्जेस दूर ठेवतो. पैंजणा मधून येणारा आवाज जर तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला कळेल कि तो देवघरात असणाऱ्या घंटेसारखा येतो. ज्यामुळे आसपासच्या परिसरातील अशुद्ध वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. हेच काम पैंजण करत. चालता फिरता पैंजणाचा मधुर आवाज कानावर पडतो आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते.

७) पायात पैंजण घातल्याने महिलेची इच्छा शक्ती मजबूत होते. हेच कारण आहे कि महिला आपल्या आरोग्याची चिंता न करता आपल्या कुटुंबाचं पालनपोषण न थकता करत असतात.

दिलेल्या माहितीतून तुम्हाला पैंजणाचे फायदे कळलेच असतील. त्यामुळे घरात अगोदरच पैंजण असेल तर काढून घालायला हरकत नाही आणि नसेल तर आपल्या बायको ला भेट म्हणून देण्यात ही काही हरकत नाही. शेवटी बायकोच आहे ती हो! सोबत आपल्याला लहान चिमुकली असेल तर तिलाही एखादी पैंजण घेऊन दया, आवडीने घालेल. पैंजण असून सुद्धा बायको घालत नसेल तर तिला ही माहिती नक्की वाचायला दया आणि इतरांशीही शेयर करा.