पेरूचे हे गुणधर्म तुम्हाला माहित नसतील, जाणून घ्या कोणते आहेत हे गुणधर्म !

2 Min Read

पेरूचे उत्पादन भारतासोबत चीन ब्राझील, कोलंबिया, मेक्सिको यांसारख्या देशात सुद्धा घेतले जाते. हे फळ ताजे खाण्यात जास्त मजा येते. पेरूचा उपयोग ज्यूस बनवण्यासाठी, जाम बनवण्यासाठी तसेच अन्य पदार्थांमध्ये देखील करतात. पेरूच्या पानांचे फुलांचे गुणधर्म हेदेखील औषधी असतात. उच्चरक्तदाब, कॅन्सर, मधुमेह व खोकला यांसारखे आजारांवर मात करण्यासाठी पेरूचे सेवन करतात. आणि पोटाच्या विकारांसाठी पेरू हा खूप गुणकारी असतो. याव्यतिरिक्त देखील पेरुचे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्याला ठाऊक नसते आज आम्ही तुम्हाला या गुणधर्माची माहिती देणार आहोत.

पेरू मध्ये विटामिन सी, फायबर तसेच इतर पौष्टिक पदार्थांचा स्त्रोत असतो तो सर्व मिळून एका एंटीऑक्सीडेंट सारखा शरीरात काम करतो. हे एंटीऑक्सीडेंट शरीरात होणाऱ्या हानीकारक प्रभावांची गती धीमी करण्यास मदत करते. पेरूच्या सालीमध्ये सुद्धा एंटीऑक्सीडेंट सोबतच इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो जे शरीरास फायदेशीर असतात.उच्च रक्तदाब एका संशोधनात असे दिसून आले आहे की बारा आठवड्यात आपण जेवढे चरबीयुक्त पदार्थ आपण सेवन करतो त्या जागी पेरूचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पोटदुखी, मोतीबिंदू, मधुमेह, खोकला, हृदय विकार, वजन संबंधीच्या समस्या यांसारख्या आजारांवर देखील पेरू फायदेशीर असतो.

पेरू मध्ये असलेले पोस्टीक सत्व हे शरीरास तंदुरुस्त राहण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. डोळे निरोगी राहण्यासाठी सुद्धा पेरूमध्ये असलेला विटामिन ए हा गुणधर्म मदत करतो. नुसते पेरूचे फळत नाही तर पेरूची पाने सुद्धा गुणकारी असतात. पेरूची पाने चावून खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात.पेरू मध्ये असलेले विटामिन सी, डी आणि पोटॅशियम हे त्वचेला तजेल करण्यासाठी मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा पेरू खाणे जरुरी आहे. एवढेच नाही तर ऍसिडिटी, दमा, दात आणि हिरड्या यांमधील दुखणे यांवर देखील पेरूचे सेवन करणे लाभदायक ठरते.

पेरू मुळे होणारे नुकसान :- पेरु मुळे जसे असंख्य फायदे आहेत. त्याचप्रमाणे काही तोटे देखील आहेत. गर्भवती महिला तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनी पेरूचे सेवन करणे टाळावे. हे त्यांच्या शरीरास घातक ठरू शकते. एखादे औषध म्हणून जर तुम्ही पेरूचा वापर करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *