मच्छरांना घरात घुसू देत नाहीत ही आठ औषधी रोपं, डेंग्यू पासून संरक्षणाचा रामबाण उपाय !

4 Min Read

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेतो आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मान्सून गेल्या नंतर मच्छरांचं साम्राज्य वाढत चाललं आहे. काही मच्छर असे आहेत ज्यांच्या चावण्यामुळे डेंगू, मलेरिया, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू असे आजार होऊ शकतात. मच्छरांच्या चावण्या पासून वाचण्यासाठी लोकं क्रीम, स्प्रे आणि मच्छरदाणी चा वापर करतात. हे करून सुद्धा ह्या मच्छरां पासून संरक्षण होत नाही. आज आम्ही तुम्हाला अश्या रोपां बद्दल सांगणार आहोत ज्यांच्या लावण्यामुळे आपल्या घराच्या आसपास मच्छर येऊ शकणार नाही आणि तुम्ही डेंग्यू आणि मलेरिया सारख्या भयानक आजारां पासून लांब राहाल.

१) तुळस – हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पवित्र मानले जाते. म्हणूनच बऱ्याच घरां मध्ये तुळशीचं रोप लावलेलं असतं. तुळशीचं रोप घरातील आणि त्याच्या आसपास च्या वातावरणाला शुद्ध करतं, पण तुम्हाला माहितीये? तुळशीच्या रोपा पासून येणाऱ्या सुगंधामुळे मच्छर घरात प्रवेश करत नाहीत. मच्छरां पासून बचाव करण्यासाठी तुम्ही सुद्धा हे रोप घरात खिडकीवर किंवा अंगणात लावू शकता. तुळशीचं रोज एक पान खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि रक्त शुद्ध होतं.२) कडुनिंब – कडुनिंबाचे तसे बरेच फायदे आहेत. पण डेंग्यू मलेरिया पासून वाचण्यासाठी सुद्धा ह्या झाडाचा वापर केला जातो. तुम्हाला जर मच्छरांचा खूपच त्रास होत असेल तर घराच्या अंगणात एक कडुनिंबाच झाड लावा. तुम्ही एका मोठ्या कुंडीमध्ये ही एक मध्यम आकाराचं रोप घरात लावू शकता. कडुनिंबाच्या झाडामुळे फक्त मच्छर नाही तर दुसरे किडे पण घरात येत नाहीत. डेंग्यू, मलेरिया किंवा कांजण्या झाल्यास कडुनिंबाची पानं तोडून रात्री झोपताना बिछान्या मध्ये पसरवून ठेवावीत.३) झेंडू – झेंडू च्या फुलांचा सुगंध खूपच आल्हाददायक असतो. घरात कोणतेही धार्मिक कार्य असल्यास झेंडू च्या फुलांचा उपयोग आवर्जून केला जातो. देवाला पूजे साठी आणि लग्नसमारंभात किंवा डेकोरेशन मध्ये झेंडू च्या फुलांचा उपयोग केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे? झेंडू च्या फुलांचा सुगंध मच्छरांना बिलकुल आवडत नाही. त्यामुळे तुमची मच्छरांशी वयक्तीक दुश्मनी असल्यास घरात झेंडू चं फुल लावायला अजिबात हरकत नाही.४) रोजमेरी – ह्याला मराठीत काय म्हणतात ह्याची आम्हाला अजिबात कल्पना नाही त्यामुळे हे रोप कसं असतं हे तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता. आपण ह्याला रोझमेरीचं म्हणूया. रोझमेरीचं एक रोप नॅचरल मॉस्किटो रिप्लियंट असतं. ह्याचं रोप पाच फुटा पर्यंत वाढू शकतं आणि ह्याला निळ्या रंगाची फुलं येतात. रोजमेरी चं रोप लावल्यास मच्छरां पासून संरक्षण होतं. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना दूर ठेवायचं असल्यास हे रोप लावायला हरकत नाही.५) लॅव्हेंडर – लॅव्हेंडर चं रोप मुख्यत्वे उत्तर आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात मिळतं. मच्छरांना दूर ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग करू शकता. लॅव्हेंडर चं रोप तुम्ही कुठेही उगवू शकता आणि ह्याची जास्त देखभाल ही करावी लागत नाही. लॅव्हेंडर चं रोप घरात लावल्यास मच्छर घरात प्रवेश करत नाहीत. लॅव्हेंडर चं तेल ही घेता येतं ज्याचा उपयोग त्वचेच्या रोगांमध्ये केला जातो. लव्हेंडर च अजून एक वैशिष्टय म्हणजे ह्याचा सुगंध खूप छान येतो आणि ह्याचा उपयोग अत्तर बनावण्यांमध्येही केला जातो.
६) सिट्रोनेला ग्रास – मच्छरां पासून बचाव करण्यासाठी सिंट्रोनेला ग्रास चा चांगला उपयोग होतो. हे एका प्रकारचे गवत असून ह्याचा एक विशिष्ट वास आहे. घराच्या आजूबाजूला तुम्ही हे गवत उगवू शकता. हे गवत ऐडीज इजिप्ती जातीच्या मच्छरांना दूर ठेवते. त्यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे मच्छर घरापासून दूर राहतात.७) पुदिना – पुदिन्याची चटणी तुम्ही खाल्लीच असेल. पण पुदिना मच्छरांना दूर ठेवण्यात ही कामाला येतो. घरात छोट्या छोट्या कुंड्यां मध्ये पुदिन्याची रोपं लावता येतात. पुदिना दिसायलाही सुदंर दिसतो. शोभेचं रोप म्हणूनही याचा वापर करता येतो. पुदिन्याची रोपं खिडक्यांवर ठेऊन द्यावीत जिथून मच्छर प्रवेश करत असतात. मधेच एखादं पान तोडून तुम्ही तुमच्या दुपारच्या चहासाठी पण वापरू शकता.सध्याचा काळ हा मच्छरांसाठी अनुकूल काळ मानला जातो त्यामुळे ह्याच वेळी ह्यापासून जास्त काळजी घेणं जरुरी आहे. त्यामुळे डेंगू आणि मलेरिया पासून वाचण्यासाठी वरील उपाय करून बघा. डेंग्यू आणि मलेरियाची लक्षण दिसल्यास ताबडतोब डॉक्टर कडे जा आणि योग्य ते उपचार घ्या. घरात पाणी साठवून ठेऊ नका त्यामध्ये डेंग्यू चे मच्छर अंडी घालतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *