कलाकार म्हंटले कि चाहते त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उस्तुक असतात. असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात जे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये उत्सुकता असते. अशामध्ये कधी कधी प्रसिध्द कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

कलाकार देखील त्यांच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर उघडपणे बोलताना पाहायला मिळत असतात. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट देखील अशाच एका वक्तव्यामुळे सध्या खूप चर्चेमध्ये आहे. प्रिया तिच्या बिनधास्त स्वभावामुळे आणि हटके अभिनयामुळे ओळखली जाते.

अभिनेत्री प्रिया सध्या तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यावरील वक्तव्यामुळे सध्या खूप चर्चेमध्ये आहे. नुकतेचा अभिनेती सुबोध भावेच्या बस बाई बस शोमध्ये सहभागी झाली होती. ज्यामध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान तिने ट्रोलिंग दरम्यानचा धक्कादायक अनुभव देखील शेयर केला.

सोशल मिडियावरील ट्रोलिंगबद्दल तिला एक प्रश्न विचारला गेला. यावर अभिनेत्रीने आपल्या पर्सनल आयुष्यामधील एक धक्कादायक अनुभव शेयर केला. अभिनेत्री म्हणाली कि एका व्हिडीओ क्लिपमुळे मला खूपच ट्रोल केले गेले होते. यावेळी मला समजले होते कि लोक थेट घरामध्येच घुसतात.

अभिनेत्री पुढे म्हणाली कि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर देखील भाष्य करू लागले कि माझे खासजी आयुष्य कसे आहे, माझा नवरा मला सुख देतो का नाही. त्यावेळी मला खूपच मनस्ताप सहन करावा लागला होता. एका कलाकार म्हणून पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळे ठेवायला. यामधून मला बाहेर पडण्यासाठी ८ ते १० दिवस लागले होते. यादरम्यान मी खूपच रडले होते. पण माझा उमेशने मला खूपच सांभाळून घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)