अशिक्षित आहे ही मराठी अभिनेत्री, मुंबईत खरेदी केली आहे १० कोटींची मालमत्ता ! बॉलिवूडमधील पॉप्यूलर फिगर राखी सावंतला हनीप्रीतच्या आईने 5 कोटींच्या डिफेमेशनची नोटीस पाठवली आहे. वादग्रस्त आणि सध्या तुरुंगात असलेल्या राम रहिमवर राखी सावंत फिल्म बनवत आहे.

यामध्ये ती स्वतः हनीप्रीतची भूमिका साकारणार आहे. राम रहिमवर बलात्काराच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर हनीप्रीत पोलिसांना घाबरून पळाली होती. राखीवर 5 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल झाल्यानंतर तिच्याबद्दलची रोचक माहिती.

अशिक्षित आहे राखी, 4 वर्षांपूर्वी केला होता हा खुलासा :- राखी सावंतने 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा तिने तिची शैक्षणिक माहिती दिली होती. त्यात तिने म्हटले होते की ती अशिक्षीत आहे. राखीने स्वतःची राष्ट्रीय आम पार्टी स्थापन करुन ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यावेळी तिने तिची संपत्ती 14.7 कोटी असल्याचे घोषित केले होते.

राखीने 4 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार तिच्याकडे 21.6 लाखांची फोर्ड एंजेव्हर कार आहे. राखीकडे साडे सात लाखांची ज्वेलरी आणि 53 लाख रुपये बँक बॅलेन्स आहे. कॉन्स्टेबल होते वडील, मुंबईत खरेदी केला 11 कोटींची मालमत्ता. राखी सावंतचे वडील आनंद सावंत हे मुंबई पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुबंईत तिची आई जया यांच्यासोबत राहाते.

राखीने मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला खरेदी केला आहे. या सर्वांची मिळून एकूण किंमत 11 कोटी रुपये आहे. तिच्या एका बंगल्याची किंमत 1.32 कोटी रुपये आहे. येथे तिचे ऑफस आहे. मुंबईत एका कॉम्पलॅक्समध्ये तिचा 7 कोटींचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2012 मध्ये खरेदी केला आहे. याशिवाय ओशिवरा बस डेपोच्या जवळील इम्पीरियल हाइट येथे 2.8 कोटींचा दुसरा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2002 मध्ये खरेदी केला होता.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.