टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई आपल्या पर्सनल आयुष्यामुळे नेहमीच चर्चेमध्ये राहिली. अनेक सिरियल्ससोबत रश्मी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि विवादित रियालिटी शो बिग बॉसचा भाग देखील राहिली आहे. रश्मीने आपल्या करियरमध्ये चांगले नाव कमवले.

रश्मी देसाईला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती टीव्हीवरील सिरियल्समधून घराघरामध्ये फेमस झाली. रश्मीने आपल्या करियरची सुरुवात २००६ मध्ये रावण सिरीयलमधून केली होती. तथापि ३६ व्या वर्षी देखील ती अजून एकटीच आहे. पण घटस्फोटीत आहे. तिचे लग्न झाले होते पण पतीसोबत मतभेद निर्माण झाल्यामुळे तिचे नाते टिकले नाही.
रश्मी देसाई टीव्ही अभिनेता नंदिश संधूसोबत नात्यामध्ये होती. रश्मी आणि नंदिश उतरनच्या सेटवर भेटले होते. दोघांनी या प्रसिध्द सिरीयलमध्ये एकत्र काम केले होते. सिरीयलमध्ये एकत्र काम करताना दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

नंदिश आणि रश्मीचे बरेच दिवस अफेयर राहिले. यानंतर दोन्ही कलाकारांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. दोघेही विवाहित आयुष्यामध्ये खुश होते पण काळानुसार त्यांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होत गेले. कपलच्या नात्यामध्ये काही वर्षांनंतर मतभेद निर्माण झाले. २०१२ मध्ये झालेले लग्न २०१६ मध्ये मोडले. लग्नाच्या चार वर्षांसोबत नंदिश आणि रश्मी घटस्फोट घेऊन वेगळे झाले. आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये रश्मी आता एकटीच आहे.
नंतर रश्मीच्या आयुष्यामध्ये तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान लक्ष्यची एंट्री झाली. तथापि दोघांमधील वयाचे अंतर पाहून रश्मीच्या आईने या नात्याला नकार दिला. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. लक्ष्य पासून वेगळे झाल्यानंतर रश्मीचे नाव दिवंगत अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लासोबत देखील जोडले गेले. दोघांमध्ये दिल से दिल तकच्या शोदरम्यान जवळीक वाढली होती. एकत्र काम करताना दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. पण खूपच लवकर त्यांचे ब्रेकअप झाले होते. दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.
लग्न मोडल्यानंतर आणि दोन अफेयर नंतर रश्मीला अभिनेता अरहान खानवर प्रेम झाले पण बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या खुलास्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. असे म्हंटले जाते कि रश्मी आणि अरहान लग्न देखील करणार होते पण हे नाते जास्त पुढे जाऊ शकले नाही.