जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णचा उल्लेख होतो तेव्हा मनामध्ये एक सुंदर चेहरा, त्यांची बासरी आणि मोरपंख लावलेली एक सुंदर छवी समोर येते. मोरपंख श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होते यामुळे ते नेहमी आपल्या डोक्यावर मोरपंख लावून ठेवत होते. माहितीनुसार मोरपंख घरामध्ये लावल्याने किडे, पाली सुद्धा दूर राहतात. तसे तर ज्योतिषमध्ये मोरपंखचे आणखीन काही उपाय सांगितले गेले आहेत ज्यांच्या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सुख समृद्धि :- आपल्या घरामध्ये सुख समृद्धि टिकवून ठेवण्यासाठी घरामध्ये दक्षिण – पूर्व कोपऱ्यामध्ये मोरपंख ठेवावे. यामुळे घरामध्ये सुख शांति टिकून राहते आणि आर्थिक स्थितीमध्ये कधी कमी येत नाही.

धनलाभ :- जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नाही आहे आणि तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही तर तुम्ही यासाठी देवघरामध्ये मोरपंख ठेवा. यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा बनून राहील आणि घरामध्ये पैसा येईल. त्याचबरोबर या उपायामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले संबंध तयार होतील.

वास्तु दोष :- जर तुमच्या आयुष्यामध्ये बराच काळ कोणत्याना कोणत्या समस्या येत आहेत आणि तुम्हाला त्यांचे कारण समजत नसेल तर तुम्ही वास्तू दोषाचे शिकार होऊ शकता. यापासून मुक्त होण्यसाठी तुम्हीं घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशजीची प्रतिमा स्थापित करावी आणि त्यासोबत २ मोरपंखसुद्धा स्थापित करावे.

राहु दोष :- कुंडलीमध्ये राहूची स्थिती चांगली नसल्यास आरोग्य, संबंध आणि आर्थिक स्थितिवर त्याचा प्रभाव पडतो. अशामध्ये या स्थितीमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही एका ताईतमध्ये मोरपंख बांधून आपल्या उजव्या हातामध्ये परिधान करावे. यामुळे तुम्हाला राहूच्या दुष्परिणामांपासून मुक्ति मिळेल.

तणाव :- जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये तणाव असेल तर तुम्ही आपल्या बेडरूमच्या पूर्वेकडील किंवा दक्षिण-पूर्वेकडील दिशेला मोर पंख स्थापित करावा. यामुळे तुमच्या नात्यांमध्ये सुरु असलेले तणाव दूर होण्यास मदत मिळेल.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.