‘या’ मुलीसाठी रिषभ पंतने उर्वशी रौतेलाचा नंबर केला होता BLOCK ? सोशल मिडियावर चर्चांना उधान…

2 Min Read

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत सध्या खूपच चर्चमध्ये आहे. नुकतेच त्याला उत्तराखंड राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. यादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत त्याची सोशल मिडियावर चांगलीच वादावादी सुरु आहे. उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीमध्ये ऋषभ पंतचे नाव घेतले ज्यानंतर इंस्टाग्रामवर दोघेही एकमेकांना उत्तर देत आहेत.

यादरम्यान आता ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगीची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमुळे ती नेहमीच चर्चमध्ये राहते. नुकतेच ईशा नेगी आईपीएल २०२२ मध्ये ऋषभ पंतला सपोर्ट करताना पाहायला मिळाली होती आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

ऋषभ पंतप्रमाणेच ईशा नेगीदेखील उत्तराखंडची आहे. ती एक इंटीरियर डिजाइनर आहे. याशिवाय ती फॅशन डिझायनिंगही करते. ईशा नेगी आणि ऋषभ पंत एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. याचा खुलासा त्यांनी सोशल मिडियावर देखील केला आहे.

ऋषभ पंतने ईशा नेगीच्या बर्थडेवर तिला इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करून विश केले होते, ज्यामध्ये त्याने तिला क्वीन म्हंटले होते. याचे उत्तर देताना ईशा नेगीने देखील ऋषभ पंतला आई लव यू म्हंटले होते. ईशा नेगी सोशल मीडिया क्वीन आहे तिचे इंस्टाग्रामवर लाखों फॉलोवर्स आहेत आणि तिचे व्हिडीओ आणि फोटो खूपच व्हायरल होत असतात.

आईपीएलमध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. यावेळी जेव्हा मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये सामने झाले तेव्हा ईशा नेगीदेखील दिल्ली कॅपिटल्सच्या प्रत्येक सामन्यासाठी हजर होती. ईशा नेगीचे फोटोज, सामन्यादरम्यानच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते. याशिवाय सोशल मीडियावर तिला ऋषभ पंतने लकी चार्म देखील सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Negi (@ishanegi_)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *