वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी करोडोंची मालकीण आहे हि बालकलाकार, महागड्या कारमध्ये करते प्रवास !

2 Min Read

वयाच्या १२ व्या वर्षामध्ये आपल्यापैकी अनेक लोक क्रिकेट, व्हिडिओ गेम्स किंवा इतर कोणत्याही खेळात व्यस्त होते. त्या काळामध्ये महिन्याला १०० रुपये पॉकेटमनी मिळायचा तेव्हा आपल्यासाठी ती खूपच खुशीची बाब होती. पण आजचा जमाना बदलला आहे. आता लहान मुले आपले कौशल्य दाखवून फेमस होत आहेत आणि त्याचबरोबर भरपूर पैसा देखील कमवत आहेत. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला १२ वर्षाच्या लहान अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्याजवळ करोडो रुपयांची संपत्ती आहे.

तुम्हा सर्वांना स्टार प्लसवर प्रसारित होणारी सिरीयल ये हैं मोहब्बतें तर चांगलीच आठवत असेल. हि सिरीयल एके काळची सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी सिरीयल होती. या सिरीयलचा पहिला एपिसोड २ डिसेंबर २०१३ मध्ये टेलीकास्ट झाला होता, या सिरीयलमध्ये दिव्यंका त्रिपाठी आणि करण पटेल मुख्य भूमिकेमध्ये होते. तर रुहानिका धवनने छोटी आणि क्युट मुलीची भूमिका साकारली होती. या सिरीयलमुळे रुहानिकाला खूपच लोकप्रियता मिळाली होती.रुहानिका खूपच सुंदर आणि गोड असून ती खूपच शांत स्वभावाची आहे. हेच कारण आहे कि कमाईच्या बाबतीत ती मोठ मोठ्या कलाकारांना मागे टाकते. माहितीनुसार रुहानिका जवळ जवळ ६.५ करोड रुपयांची मालकीण आहे. रुहानिकाला प्रत्येक एपिसोडसाठी २५००० रुपये इतके मानधन मिळते.ती आपल्या शुटींगच्या सेटवर ऑडी ए ४ मॉडेलच्या लक्झरी कारमधूनही येत असते. या कारची किंमत जवळ जवळ ५० लाख रुपये इतकी आहे. रुहानिकाने स्वतः हि कार आपल्या कमाईमधून खरेदी केली आहे. याशिवाय तिने एक ३ बीएचके फ्लॅट देखील खरेदी केला आहे. रुहानिकाचे स्वप्न आहे कि तिला मोठी होऊन एक उत्कृष्ठ अभिनेत्री, सिंगर आणि फॅशन डिझायनर बनायचे आहे. टीव्ही आणि जाहिरातींशिवाय रुहानिका २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या घायल वंस अगेन या सनी देओलच्या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *