आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने आणि चित्रपट प्रेमींच्या हृदयावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. त्यांनी गिरगाव स्थित आपल्या घरामध्ये अंतिम श्वास घेतला. मोरूची मावशी नाटकामध्ये प्रतीप पटवर्धन यांनी केलेल्या भूमिकेला दर्शकांनी खूपच पसंद केले होते.

प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मिडियावर पोस्ट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत विनोदी भूमिका करून त्यांनी दर्शकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिका खूपच गाजल्या होत्या.

एक फूल चार हाफ, चश्मे बहादुर, घोळ बेरीज़, डांस पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, पुलिस लाइन, आणि टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, पॅरिस, थँक यू विठ्ठला सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीला प्रदीप पटवर्धन यांनी अमुल्य योगदान दिले आहे.

त्यांनी कॉलेजमधील वन अॅक्ट प्ले मधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये परफॉर्म करताना त्यांना प्रोफेशनल थियेटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचा प्रवास सुरु झाला.

आपल्या अभिनयामधून नेहमीच दर्शकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले. त्यांच्या जाण्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीची मोठी हानी झाली आहे. सिनेसृष्टीचे हे नुकसान कधीच न भरून येणार आहे.