काय तुम्हाला माहितीये का ? भारतात कुठे झालं होतं समुद्रमंथन, जाणून घ्या रंजक कथा !

4 Min Read

भगवान शिव शंकराला वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक केला जातो. त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्यांच्याकडून वरदान मागितले जाते. सगळ्यांना माहीत आहे भगवान शिवाची महिमा जाणून घेण्यासाठी जसे शिवपुराण प्रचलित आहे. त्या शिवपुरणाच्या एका अध्यायात विशेष करून समुद्रमंथनाचा उल्लेख आढळतो. चला तर मग जाणून घेऊयात समुद्रमंथन शिवाच्या कृपेशिवाय पूर्ण झाले नसते.

समुद्रमंथन आणि भगवान शिव यांचा काय संबंध आहे :- भारताला फार मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. आणि या सांस्कृतिक परंपरेत पौराणिक कथांना विशेष महत्त्व आहे. पूर्वापार चालत आलेल्या पौराणीक कथा आपल्याला अध्यात्मिक स्वरूपातील माहिती विस्तृत स्वरूपात देत असतात. आणि या माहितीच्या आधारेच आपल्याला गतकाळातील विविध माहिती मिळत असते. पौराणिक कथांचा विचार केला गेला तर समुद्रमंथन देव आणि दैत्य यांच्यामध्ये झाले होते.

या समुद्रमंथनात भगवान शिवाचे अतिशय महत्त्व होते. या समुद्रमंथनाच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात विष बाहेर पडले होते. हे विष इतके भयंकर होते की, त्यामुळे धरतीचा विनाश होणे अटळ होते. मात्र भगवान शिवांनी पृथ्वीच्या रक्षणार्थ हे विष प्राशन केले आणि संपूर्ण पृथ्वीचा बचाव केला. यामध्ये देवी-दैत्यांचा सुद्धा समावेश होता. हे विष प्राशन केल्यानंतर भगवान शिवाचा कंठ निळा पडला. ते सर्व विष त्यांनी आपल्या कंठात साठवून ठेवले होते. तेव्हापासून भगवान शिव नीलकंठ या नावाने सुद्धा ओळखले जाऊ लागले.

मात्र असे असले तरी तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? समुद्रमंथन झाले ती भारतातील कोणती जागा होती? कोणत्या ठिकाणी समुद्रमंथन झाले होते? नाही ना. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, समुद्रमंथन ज्या ठिकाणी झाले होते. त्या ठिकाणची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.कुठे झाले होते समुद्रमंथन..खरच समुद्रमंथन देव आणि दानव यांच्यात झाले होते. हे समुद्रमंथन मंदराचल पर्वताच्या सभोवताली झाले होते. हा मंदराचल पर्वत सध्याच्या गुजरात राज्याच्या दक्षिणी समुद्रात आहे. समुद्रमंथनाच्या प्रक्रियेदरम्यान मंदराचल पर्वताला चारही बाजूने वासुकी नाग गुंडाळण्यात आला होता आणि त्याद्वारे समुद्रमंथनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. भारतात झालेल्या एका वैज्ञानिक परीक्षणाद्वारे हे निष्कर्ष समोर आले होते. दक्षिण गुजरातमध्ये पिंजरात हे गाव समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. तेथील काही गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढले आहेत. एका संशोधनात काही गोष्टी समोर आल्या आहेत आणि या गोष्टी म्हणजे हा पर्वत खूपच मोठा आहे आणि या पर्वताच्या मध्यभागी नागाची एक प्रतिकृती बनलेली आहे.या पर्वतावर घर्षण झाल्यासारखे अनेक निशान आढळून येतात हे असं निशाण आढळल्यानंतर याच्यावर अध्ययन करण्यास सुरुवात झाली होती. मंदराचल पर्वताचा उपयोग समुद्रमंथनात केला गेला होता. वैज्ञानिकांनी काही संशोधन केले होते त्यात अशी गोष्ट समोर आले की ग्रॅनाईटचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा मंदराचल पर्वत आहे हे निष्कर्ष समोर आले होते. याच पिंजरात गावात 1988 झाली द्वारका नगरीचे सुद्धा अवशेष मिळाले होते. तेव्हापासून आजतागायत या ठिकाणच्या समुद्रतळाशी संशोधनाचे कार्य अद्यापही सुरू आहे. याच प्रकारचे संशोधन करत असताना समुद्राच्या तळाशी 800 मीटरच्या खोलीवर हा पर्वत आढळून आला होता.या पर्वतावर घर्षण झाल्याचे निशान स्पष्टपणे दिसतात. त्यानंतर याचे अध्ययन सुरू करण्यात आले होते. खरंतर अशा प्रकारचे निशान समुद्राच्या लाटांमुळे सुद्धा निर्माण होऊ शकतात. मात्र या पर्वताची विशेष कार्बन टेस्ट केल्यानंतर ही गोष्ट समोर आली की हाच तो मंदराचल पर्वत आहे. ज्याचा वापर समुद्रमंथनासाठी केला होता. हा पर्वत पिंजरात गावाच्या दक्षिण दिशेला 145 किलोमीटर अंतरावर आहे.तसेच तो 800 मीटर खोलीवर स्थित आहे. यावरून एका गोष्टीची सत्यता समोर येते. समुद्रमंथन फक्त पुराणांमध्ये सांगितलेली काल्पनिक कथा नसून एक सत्य घटना आहे.आजवर अनेक पौराणिक मालिकांच्या माध्यमातून समुद्रमंथनाची प्रक्रिया आपण टीव्हीवर पाहत आलो आहोत. मात्र तरीही समुद्रमंथनाविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न होते, त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या लेखातून नक्कीच मिळाली असतील. तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा लवकरच भेटू या पुढील लेखात एका रंजक आणि रोचक माहिती सह.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *