सामान्य माणसाच्या जीवनात छोट्या छोट्या आनंदाला देखील खूप महत्त्व असते. आनंद हा अनमोल असतो, ज्याची इच्छा प्रत्येक माणसाला असते. घरात एखादी नवीन वस्तू आणल्यावर खूप आनंद होतो, पण तुम्ही कधी एखादी जुनी वस्तू खरेदी करून आनंद साजरा करताना कोणाला पाहिले आहे का? आजच्या काळामध्ये लोकांसाठी सेकंड हँड गाडी खरेदी करणे खूपच छोटी गोष्ट असली तरी सध्याच्या काळात अनेक लोक असे आहेत ज्यांच्यासाठी जुन्या वस्तू खरेदी करणे देखील खूप मोठी गोष्ट आहे.

सोशल मीडियावर अनेकवेळा विनोदी आणि भावनिक व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडील सेकंडहँड जुनी सायकल विकत घेतात, ती बघून त्यांचा लहान मुलगा आनंदाने उड्या मारायला लागतो. मुलगा सतत आनंदे उड्या मारत आहे, तो हसत आहे, तो जोरात टाळ्या वाजवत आहे. त्याला पाहून असे वाटत आहे कि त्याला जे हवे ते मिळाले आहे. जणू काही त्याला जगातील सर्वात अद्भुत गोष्ट मिळाली आहे. या गरीब कुटुंबाकडे जुनी सायकल आल्याचा आनंद बाप आणि मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका साध्या घरासमोर एक माणूस उभा आहे. तो जुन्या सायकला फुलांचा हार घालून त्यावर पाणी टाकतो आहे. तो सायकलची पूजा करताना दिसत आहे. दुसरीकडे त्या माणसाचा छोटा मुलगा आनंदाने उड्या मारत आहे आणि टाळ्या वाजवत आहे.

टाळ्या वाजवणाऱ्या मुलाचा आनंद पाहून तुम्ही हा अंदाज लावू शकता कि जुनी सायकल त्यांच्या कुटुंबासाठी किती महत्त्वाची आहे. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंदापेक्षा वडिलांसाठी याहून मोठे बक्षीस काय असू शकते. मुलाला एवढा आनंदी पाहून बापही स्वत:ला सुपरहिरोपेक्षा कमी समजणार नाही. वडिलांनाही मनातल्या मनात स्वतःचा अभिमान वाटत असावा.

हा भावनिक व्हिडिओ IAS अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेयर करत त्यांनी लिहिले कि, हि फक्त सेकंड हँड सायकल आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. त्याची अभिव्यक्ती म्हणते, जसे की त्यांनी नवीन मर्सिडीज बेंझ घेतली आहे. खरंच व्हिडिओमध्ये बाप-लेकाचा आनंद तुम्हाला विचार करायला भाग पडेल. त्या वडिलांसाठी हि सायकल किती महत्त्वाचीआहे हे फक्त बाप-लेकालाच माहीत आहे. दोघांचे हावभाव काहीही न बोलता खूप काही सांगत आहेत. खरं तर ती बाप-लेकाच्या प्रेमाची भाषा आहे. जी म्हणत आहे कि आम्हाला देखील आनंदी राहण्याचा अधिकार आहे.

सोशलवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळ जवळ २ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडला आहे. ट्विटला रिप्लाय देताना एका यूजरने लिहिले की, हे गरीब आहेत साहेब, म्हणूनच ते प्रत्येक गोष्टीला आणि लोकांना इतका आदर देतात. हे गरीब आणि श्रीमंतीमधील अंतर आहे आणि हे खरे असा आनंद फक्त त्यालाच समजतो.