बॉलीवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिद कपूर गेल्या १६ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. लहानपणी शाहिद कपूर खूपच खोडकर होता. पण आज तो तितकाच सिरीयस व्यक्ती आहे. शाहिद कपूरला लहानपणी गिफ्ट घेणे खूप आवडत होते.
जसे प्रत्येक लहान मुलाला आपल्या वाढदिवशी हे जाणून घेण्याची उत्सुकता असते कि त्याला कोणते गिफ्ट मिळणार आहे. तशीच अवस्था शाहिद कपूरचीही होती. शाहिद कपूरने एकदा आपल्या वाढदिवसा संबंधी एक किस्सा सांगितला. शाहिद कपूर म्हणाला कि लहानपणी तो गिफ्टचा खूपच शौकीन होता. त्याला रंगीबेरंगी गिफ्ट खूप आकर्षित करत असत.