“त्यानं जबरदस्ती माझे…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा ‘या’ अभिनेत्याविषयी खळबळजनक खुलासा…

2 Min Read

हसताय ना हसायलाच पाहिजे म्हणत निलेश साबळे आणि त्यांचा ग्रुप गेली अनेक वर्षे चला हवा येउद्या शोच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील सर्व भूमिका पोट धरून हसायला लावतात. मग ते भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे असो. या सर्व कलाकारांमध्ये श्रेया बुगडे देखील आपल्या हटके भूमिकेमधून लोकांचे मनोरंजन करत असते.

कोणतीही भूमिका असो अभिनेत्री ती लीलया पार पाडते. पण सध्या श्रेय बुगडे वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे. सध्या तिची इंस्टाग्राम पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. तिने पोस्ट शेयर करत असे कॅप्शन दिले आहे कि ज्यामुळे तिचे चाहते खूपच हैराण झाले आहेत.

नुकतेच झी मराठी अवॉर्ड्स २०२२ ची नॉमिनेशन पार्टी मुंबईमध्ये झाली होती. यादरम्यान अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रेय बुगडेदेखील यादरम्यान शिमरी थीम चा वेस्टर्न गाऊन घालून सोहळ्यामध्ये सामील झाली होती. या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

या लुकमधील काही फोटो शेयर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि कुशल बद्रिकेने माझ्या फोनमधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा १ व्हिडीओ बनवला आहे आणि मला तो पोस्ट करण्याची जबरदस्ती केली. आहे म्हणून मी हा व्हिडीओ शेयर करत आहे. पण मी तुम्हाला लाइक्स आणि कमेंट्स करण्याची जबरदस्ती करू शकत नाही. श्रेय आणि कुशल खूपच चांगले मित्र आहेत. ते नेहमी मस्ती करताना पाहायला मिळत असतात. श्रेयाने पुढे लिहिले आहे कि मी देवाचे आभार मानते, यावर कुशलने स्वतःच स्वतःचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *