बॉलीवूड आणि क्रिकेटचा संबंध खूपच जुना आहे. भारतीय क्रिकेट टीममधील अनेक दिग्गज खेळाडूंनी बॉलीवूडमधील कलाकारांसोबत लग्न करून संसार थाटला आहे. याचे अलीकडचेच उदाहरण म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले होते. त्याचबरोबर युवराज सिंह देखील प्रसिद्ध अभिनेत्री हेजल कीचसोबत विवाह बंधनात अडकला होता. भारतीय क्रिकेट संघातील असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी बॉलीवूडमधील अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे.पण आता भारतीय क्रिकेट संघातील महिलादेखील मागे नाहीत. नुकतेच भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू स्मृती मंधानाने देखील एका बॉलीवूड अभिनेत्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्मृती मंधाना हि भारतीय महिला क्रिकेट संघातील उत्कृष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेट विश्वामध्ये स्मृतीचे अनेक चाहते आहेत. सध्या स्मृतीबद्दल बरीच चर्चा समोर येत आहे आणि तिचे नाव एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत जोडले जात आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ आहे. टायगर श्रॉफने आतापर्यंत बॉलीवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच टायगर श्रॉफ बागी ३ चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला जमवला होता.
स्मृतीने एका मुलाखतीमध्ये तिला टायगर श्रॉफ आवडत असल्याची कबुली दिली होती. मुलाखतीदरम्यान स्मृतीला प्रश्न विचारला गेला कि तुला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल? यावर ती उत्तर देताना म्हणाली कि, मी टायगर श्रॉफची खूप मोठी फॅन आहे आणि मला टायगर श्रॉफला डेट करायला आवडेल आणि जर टायगरने होकार दिल्यास ती नक्कीच त्याला डेटवर घेऊन जाईल. याचबरोबर स्मृतीने मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले.
टायगरबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या रँबो या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.