बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपट रिलीज होऊन चार आठवडे उलटून गेले तरी अजूनही लोक चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहत आहेत.

सोशल मीडियावर झूमे जो पठाण गाण्यावर रील बनून मोठ्या प्रमाणत शेयर केले जात आहेत. नुकतेच दिल्ली विद्यापीठाच्या महिला प्राध्यापकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला प्राध्यापक विद्यार्थिनींसोबत जबरदस्त डांस करताना पाहायला मिळत आहेत.

हा डांस सध्या सर्वांनाच खूपच आवडला आहे. हा व्हिडिओ डिपार्टमेंट ऑफ़ कॉमर्स जेएमसी द्वारे शेयर केला गेला आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या जीसस मेरी कॉलेजमधील एका फंक्शन दरम्यान शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामधील झुमे जो पठाण गाण्यावर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डांस केला.

ही व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत असून आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, पिवळ्या साडीतील मॅमने तर आग लावली आहे. आणखी एक युजरने लिहिले आहे की, असे प्राध्यापक आम्हाला देखील हवे होते. प्रप्रकारे अनेक लोक या डांसचे कौतुक करत आहेत. हा डांस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.