टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी मुंबई येथील आपल्या घरामध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री सहित पूर्ण देशामध्ये शोकाकुल लाट पसरली आहे. यादरम्यान अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल अनेकजण वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्याच्या या घटनेमागील कारण जाणू इच्छित आहेत. यादरम्यान सोशल मिडियावर काही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसवर देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तर अभिनेत्याच्या मॅनेजर आणि क्रिएटिव मॅनेजरच्या विधानानुसार अभिनेता गेल्या ६ महिन्यापासून उदासीनते झगडत होता. यादरम्यान अभिनेत्याला प्रत्येक घरा-घरामध्ये ओळख देणारा सुपरहिट शो पवित्र रिश्तामधील अनेक कलाकारांनी देखील त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी ऐकून उषा नाडकर्णी यांना बसला धक्का, म्हणाल्या सर्व काही होते मग का?
Leave a comment